agriculture news in Marathi heat increased in state Maharashtra | Agrowon

उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही; अकोला ४३.८ अंश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 एप्रिल 2020

मंगळवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.८, तर जळगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुणे : एप्रिल महिना मध्यावर आला असतानाच राज्याच्या तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.८, तर जळगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच तापमान ४३ अंशांपार गेले आहे. उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाचा ताप वाढला असतानाच, राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.१५) विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. 

राज्यात उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेल्याने दुपारच्या वेळी बाहेर पडणेही त्रासदायक ठरत आहे. तर कोकणात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३४ अंशांच्या आसपास आहे. विदर्भ चांगलाच होरपळला असून, बहुतांशी ठिकाणी तापमान ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे. खानदेशात ऊन वाढले असून, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ३८ ते ४३ अंश, तर मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांच्या असपास आहे. पुढील काळात उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. 

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता.१५) मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात आकाश अंशत: ढगाळ राहून उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.७, जळगाव ४३.०, धुळे ४२.०, कोल्हापूर ३७.४, महाबळेश्‍वर ३१.१, नाशिक ४०.२, निफाड ३९.०, सांगली ३८.०, सातारा ३८.६, सोलापूर ४०.९, डहाणू ३३.८, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३३.४, औरंगाबाद ४०.१, बीड ४१.१, परभणी ४२.२, नांदेड ४१.५, अकोला ४३.८, अमरावती ४२.२, बुलडाणा ३८.६, ब्रह्मपुरी ४०.४, चंद्रपूर ४०.०, गोंदिया ४१.२, नागपूर ४१.२, वाशीम ४२.०, वर्धा ४१.७. 

तापमान ४२ अंशापार गेलेली ठिकाणे : 
अकोला ४३.८, जळगाव ४३.०, परभणी ४२.२, अमरावती ४२.२, धुळे ४२.०, वाशीम ४२.०. 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...