agriculture news in Marathi heat increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाच्या झळांनी काहीली वाढली 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४७.५, तर विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने महाराष्ट्रासह, वायव्य आणि मध्य भारतातील राज्यामध्ये उष्णतेची लाट आहे. मंगळवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४७.५, तर विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात आज (ता.२७) उष्ण लाटेचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्ण लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

महाराष्ट्रासह पश्‍चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, गुजरात राज्यात उष्ण लाट आली आहे. राजस्थानमधील चुरूसह, विदर्भातील अकोला, नागपूर मध्ये तापमान ४७ अंशाच्यापुढे असल्याने उष्णतेची तीव्र लाट आहे. तर राज्यातील जळगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा येथे तापमान ४५ अंशापेक्षा अधिक आहे.

सातारा आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असून, सरासरीपेक्षा ४.५ अंशाची वाढ झाल्याने उष्ण लाटेची स्थिती आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.४ अंश तापमान झाले आहे. यापुर्वी २२ मे १९४७ रोजी अकोल्यात सर्वकालीन उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

उत्तर आणि वायव्य दिशेने मध्य व दक्षिण भारताकडे येणारे कोरडे वारे, उन्हाचा वाढलेला ताप यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. उत्तर भारतात पश्‍चिमी चक्रावाताची निर्मिती झाल्याने उद्यापासून (ता.२८) या भागात पावसाची शक्यता आहे. परिणामी दोन दिवसांत उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारपर्यंत (ता.२९) विदर्भासह महाराष्ट्राच्या तापमानातही घट होऊन उष्णतेची लाट काहीशी कमी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.१, धुळे ४४.०, जळगाव ४५.३, कोल्हापूर ३७.४, महाबळेश्‍वर ३२.२, मालेगाव ४३.६, नाशिक ३९.२, निफाड ४०.०, सातारा ४०.४, सांगली ३९.७, सोलापूर ४५.०, डहाणू ३५.५, सांताक्रूझ ३३.७, रत्नागिरी ३३.७, औरंगाबाद ४३.१, परभणी ४६.०, नांदेड ४५.५, अकोला ४७.४, अमरावती ४६.०, बुलडाणा ४२.६, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४६.८, गोंदिया ४५.८, नागपूर ४७.०, वर्धा ४६.०. 

अंदमानात मॉन्सूनची चाल शक्य 
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) रविवारी (ता.१७) दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल झाले. मात्र त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल मंदावली. आज (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तब्बल दहा दिवसापासून ‘जैसे थे’ असणारा मॉन्सून अंदमानात चाल करण्याची शक्यता आहे. 

कमी दाब क्षेत्राचे संकेत 
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ महा चक्रीवादळ निवळल्यानंतर आता केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. मंगळवारी (ता.२६) या भागात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. रविवारपर्यंत (ता.३१) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या कमी दाब क्षेत्राचा मॉन्सूनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा केरळातील आगमन काहीसे लांबून, मॉन्सून पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. यात चार दिवसांची मागे पुढे तफावत होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविला आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...