agriculture news in Marathi heat increased in state Maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाची तीव्रता वाढली 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे सकाळपासून प्रखर ऊन पडत असल्याने दुपारी चटका वाढत आहे.

पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे सकाळपासून प्रखर ऊन पडत असल्याने दुपारी चटका वाढत आहे. काही भागात कमाल व किमान तापमानात चढउतार सुरू झाले आहे. गुरुवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे कमाल ३५.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यातून नैऋत्य मॉन्सूनचे वारे माघारी गेल्याने हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत असून ऑक्टोबर हीट वाढू लागली आहे. त्यातच मागील पाच ते सहा दिवसांपासून राज्यात ऊन पडण्यास सुरवात झाली आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे.

मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्याचबरोबर किमान तापमानातही काही भागात घट झाली आहे. 
विदर्भातील अमरावती येथे सरासरीच्या तुलनेत उणे ४.५ अंश सेल्सिअसने घट होऊन येथे १५.३ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३.२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.    

सध्या उत्तरेकडून वारे वाहण्यास सुरवात झाल्याने राज्यातील वातावरणात बदल होऊ लागले आहेत. त्यातच पाऊस गेल्याने मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी धुके पडण्यास सुरवात झाली आहे. पुण्यातही कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुण्यात कमाल तापमान जवळपास ३२.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.


इतर अॅग्रो विशेष
संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी...प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल :...मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले...
‘स्वाभिमानी’चा मोर्चा स्थगितसातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कऱ्हाडला...
संत्रा पट्ट्यातून ‘किसान रेल’ सुसाटनागपूर : संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि...
संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाईअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या...
केळी उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा...गिरगाव, जि. हिंगोली : राज्यातील अन्य...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य...
शेतकऱ्यांनी पकडले सोयाबीन चोरअमरावती : घराच्या अंगणात ठेवलेले ३१ पोते सोयाबीन...
शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात...जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच...
सहकारी संघाकडूनही गाईच्या दूधदरात कपात नगर ः लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली...
पशुखाद्य दरात वाढसांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...