विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

बंगाल उपसागरात आलेल्या ‘अम्फाम’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तापला आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणे: बंगाल उपसागरात आलेल्या ‘अम्फाम’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तापला आहे. गुरूवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२२) विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे, तर उर्वरीत राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेचा ताप वाढला आहे. मध्य प्रदेशातील खारगोणे येथे देशातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेला आहे. विदर्भातील अकोला येथे ४४.७, नागपूर येथे ४४.३ अंश, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर परभणी, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा येथे तापमान ४३ अंशापेक्षा अधिक आहे. आज (ता.२२) राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

गुरूवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.२, धुळे ४२.०, जळगाव ४४.०, कोल्हापूर ३४.०, महाबळेश्‍वर २९.९, मालेगाव ४१.२, नाशिक ३७.०, निफाड ३७.६, सातारा ३७.१, सोलापूर ४२.१, डहाणू ३४.४, सांताक्रूझ ३३.८, रत्नागिरी ३४.७, औरंगाबाद ४०.६, परभणी ४३.६, नांदेड ४२.५, अकोला ४४.७, अमरावती ४३.४, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ४३.०, गोंदिया ४३.२, नागपूर ४४.२, वर्धा ४३.१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com