विदर्भात उन्हाचा चटका वाढला

विदर्भात उन्हाचा चटका वाढला
विदर्भात उन्हाचा चटका वाढला

पुणे : विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. चंद्रपूर, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. तर उर्वरित राज्यातही तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांच्या आसपास आहे. चंद्रपूर येथे तापमान यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४३.८ अंशांवर पाचले आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, उद्यापासून (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  मार्च महिन्यापासूनच राज्यात उन्हाचा ताप वाढला असून, महिन्याच्या अखेरीस तापमान ४३ अंश पार झाले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात (ता. ४) अकोला येथे तापमान ४३.८ अंशांवर गेले होते. त्यानंतर राज्यात वादळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाचा चटका कमी होऊन तापमान काहीसे कमी झाले होते. मात्र सोमवारपासून पुन्हा तापमानात वाढ झाली.  मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे तापमान ४३.८ अंशांवर पोचले. मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथेही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. तर जळगाव, नगर, मालेगाव, सोलापूर, परभणी, वाशीम, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे.  दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीनपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे विदर्भात ढगाळ हवामान झाले होते. उद्यापासून (ता. ११) मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.० (२.७), नगर ४२.६ (३.८), जळगाव ४२.४ (१.८), कोल्हापूर ३९.५ (२.४), महाबळेश्वर ३४.९ (३.२), मालेगाव ४३.२ (४.०), नाशिक ३८.४ (१.१), सांगली ४०.४ (२.२), सातारा ३९.५ (३.०), सोलापूर ४२.० (२.५), अलिबाग ३१.० (-०.७), डहाणू ३३.६ (१.२), सांताक्रूझ ३३.५ (०.३), रत्नागिरी ३४.० (१.९), औरंगाबाद ४०.७ (२.८), बीड ४१.९ (३.२), नांदेड ४१.५ (१.५), परभणी ४२.५ (२.७), अकोला ४३.७ (३.७), अमरावती ४३.२ (२.९), बह्मपुरी ४३.२ (३.८), चंद्रपूर ४३.८ (३.४), गडचिरोली ४१.२ (-०.४), गोंदिया ४१.० (१.८), नागपूर ४१.८ (२.३), वाशीम ४२.०, वर्धा ४२.५ (२.४), यवतमाळ ४१.५ (२.१). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com