agriculture news in Marathi heat increasing in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाचा चटका वाढू लागला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात सकाळपासून ऊन पडत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे.

पुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात सकाळपासून ऊन पडत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्रात अजूनही काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत या भागात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरूवात झाली आहे. तर राज्यातील अनेक भागातून मंगळवारी (ता.२७) परतीच्या मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे पावसाने मराठवाडा व विदर्भात आणि खानदेशातील अनेक भागांत उघडीप दिली आहे. सध्या या भागांत सकाळपासून ऊन पडत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे जळगाव येथे मागील दोन ते तीन दिवसांपासून ३५.३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. 

राज्यात मध्यरात्रीनंतर कमाल तापमानाचा पारा कमी होत असून पहाटे बऱ्यापैकी थंड वारे वाहत आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. सातारा, महाबळेश्वर, अलिबाग, बुलडाणा या भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

मॉन्सून आज निरोप घेण्याची शक्यता
राज्यात धुमाकूळ घातलेल्या परतीच्या मॉन्सूनने महाराष्ट्रातील अनेक भागातून माघार घेतली आहे. त्यानंतर संपूर्ण देशातून माघार घेण्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण असल्याने आज (ता.२८) देशातून निरोप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पावसाची उघडीप राहणार असून सकाळपासून ऊन पडणार , त्यामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात लागलीच थंडी सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. 

मध्य महाराष्ट्र, कोकणात हलक्या सरी
कोकणातील सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, व सोलापूर जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्गमधील अंजर्ला, अंगावली, कोंडेया, राजापूर, कुंभावडे, पाचल, विलवडे अशा काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. पावसामुळे या भागांत भात काढणी काही प्रमाणात खोळंबली आहे. तर मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने शेतकरी पावसाच्या उघडिपीची वाट पाहत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...