राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  

परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्यानंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उकाडा वाढण्यास सुरूवात झाली आहे.
Heat
Heat

पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्यानंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उकाडा वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातही आकाश निरभ्र राहत असून उन्हाचा पारा वाढत आहे. किमान तापमानात चढउतार सुरू असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात दोन ते तीन दिवसांपासून बऱ्यापैकी ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुण्यातही कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले आहे. तर काही ठिकाणी कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे ३५.४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणच्या दक्षिण भागात काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर किमान तापमानात चढउतार असले तरी नाशिक येथे १६.३ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंदविले गेले. तुरळक ठिकाणी हलका पाऊस परतीच्या पावसाने राज्यातून माघार घेतली असली तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणातील लांजा येथे २४.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. संगमेश्वर देवरूख १०.०, कणकवली ६,०, वैभववाडी १.० मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा १०.० मिलिमीटर पाऊस पडला. तर कोल्हापुरातील शाहूवाडी ३.०, सांगलीतील आटपाडी, कडेगाव, वाळवा, कराड, कोरेगाव, पाटण, सोलापूरातील मोहोळ, सोलापूर येथेही पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com