agriculture news in Marathi heat increasing in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्यानंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उकाडा वाढण्यास सुरूवात झाली आहे. 

पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार घेतल्यानंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उकाडा वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातही आकाश निरभ्र राहत असून उन्हाचा पारा वाढत आहे. किमान तापमानात चढउतार सुरू असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात दोन ते तीन दिवसांपासून बऱ्यापैकी ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुण्यातही कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले आहे. तर काही ठिकाणी कमाल व किमान तापमानात घट झाली आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे ३५.४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणच्या दक्षिण भागात काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर किमान तापमानात चढउतार असले तरी नाशिक येथे १६.३ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंदविले गेले.

तुरळक ठिकाणी हलका पाऊस
परतीच्या पावसाने राज्यातून माघार घेतली असली तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणातील लांजा येथे २४.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. संगमेश्वर देवरूख १०.०, कणकवली ६,०, वैभववाडी १.० मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा १०.० मिलिमीटर पाऊस पडला. तर कोल्हापुरातील शाहूवाडी ३.०, सांगलीतील आटपाडी, कडेगाव, वाळवा, कराड, कोरेगाव, पाटण, सोलापूरातील मोहोळ, सोलापूर येथेही पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या.


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...