नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका जाणवू लागला
मागील चार ते पाच दिवसांपासून थंडीचा प्रभाव ओसरू लागला आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे.
पुणे ः मागील चार ते पाच दिवसांपासून थंडीचा प्रभाव ओसरू लागला आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक भागात ऊन वाढत असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १४.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर आणि ४.५ किलोमीटर उंचीवर चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. अशीच स्थिती हिंदी महासागराच्या परिसरात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. अरबी समुद्राच्या परिसरातील चक्रिय वाऱ्याने राज्यात भूपृष्टावर असलेले बाष्पयुक्त वारे खेचल्याने कोकण व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात सोमवारी सकाळी अंशतः ढगाळ वातावरण होते.
सकाळी दहा वाजेनंतर ऊन पडल्याने
ढगाळ वातावरण निवळून गेले. त्यानंतर उकाड्यात चांगलीच वाढला होता. त्यामुळे किमान तापमानासह कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. रविवारी (ता.२८) उन्हाचा चटका वाढल्याने सोमवारी सकाळपर्यंत चंद्रपूर येथे ३९.२ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती.
सध्या कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन उन्हाचा पारा वाढत असल्याने कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रातही गेल्या काही दिवस थंडीचा चांगलाच प्रभाव होता. मात्र, आता तो हळूहळू कमी झाल्याने किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उन्हाच्या चटक्यामुळे कमाल तापमानातही चांगलीच वाढ होत असून कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.
मराठवाड्यातही ऊन वाढत आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत आठ, तर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात थंडी वेगाने कमी झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.
सोमवारी (ता.१) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रुझ) २१.४ (२)
- ठाणे २१.०
- अलिबाग २२.० (३)
- रत्नागिरी १९.५ (-१)
- डहाणू १९.१
- पुणे १९.६ (६)
- नगर १९.४
- जळगाव १९.० (४)
- कोल्हापूर २०.५ (३)
- महाबळेश्वर १७.५ (२)
- मालेगाव २०.८ (७)
- नाशिक १७.५ (४)
- निफाड १४.५
- सांगली १९.१ (३)
- सातारा १६.५ (१)
- सोलापूर २२.७ (२)
- औरंगाबाद २३.९ (८)
- बीड १९.३ (३)
- परभणी २३.९ (७)
- नांदेड १७.५ (१)
- उस्मानाबाद १८.४ (१)
- अकोला २१.२ (४)
- अमरावती २०.३ (१)
- बुलडाणा २१.२ (२)
- चंद्रपूर २१.४ (३)
- गोंदिया १७.०
- नागपूर १८.१ (१)
- वर्धा २०.६ (३)
- यवतमाळ २०.० (१)