जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
उन्हाचा पारा वाढू लागला
राज्यातील अनेक भागांत उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. यामुळे उकड्यात वाढ होत असून, कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत उन्हाच्या चटक्यात आणखी वाढ होईल.
पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. यामुळे उकड्यात वाढ होत असून, कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत उन्हाच्या चटक्यात आणखी वाढ होईल. उन्हाचा पारा वाढत असला तरी काही ठिकाणी थंडी अजूनही कायम आहे. गुरुवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १० अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सागितले.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात चक्रीय स्थिती कायम आहे. त्यातच उत्तर भारतातील अनेक भागांत हवामान बदल होत असून, त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. राज्यात कोरडे हवामान असल्याने ऊन वाढत आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून, दुपारी पारा जवळपास चाळिशीपर्यंत जात आहे.
विदर्भातील अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. तर कमाल तापमानाची ३६ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर या भागात काही प्रमाणात किचिंत थंडी असल्याने किमान तापमानात काहीशी घट असली तरी १४ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.
कोकणात थंडी कमी झाली असून ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा चार अंस सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. मुंबई येथे सर्वाधिक ३७.३ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तामपानाची नोंद गुरुवारी सकाळपर्यंत झाली आहे. तर किमान तापमानाचा पारा २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमीअधिक स्वरूपात असली तरी ती आता कमी होऊ लागली आहे.
या भागात किमान तापमानाचा पारा १२ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही तापमान वाढू लागले असून ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे.
गुरुवारी (ता.४) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१)
- ठाणे २१.२
- अलिबाग २०.७ (१)
- रत्नागिरी २१.१
- डहाणू २१.४ (१)
- पुणे १४.७ (१)
- नगर १५.९
- जळगाव १२.७ (-४)
- कोल्हापूर २१.२ (३)
- महाबळेश्वर १८.९ (३)
- मालेगाव १६.६ (२)
- नाशिक १४.४
- निफाड १०
- सांगली २० (२)
- सातारा १६.५
- सोलापूर २१.४ (१)
- औरंगाबाद १६.६
- बीड १९.३ (३)
- परभणी १७.६(१)
- परभणी कृषी विद्यापीठ १४.३
- नांदेड १५ (२)
- उस्मानाबाद १८.७
- अकोला १६.५ (-२)
- अमरावती १९.३
- बुलडाणा १९.२
- चंद्रपूर १६.४ (-३)
- गोंदिया १४.२ (-३)
- नागपूर १५.४ (-२)
- वर्धा १६.६ (-१)
- यवतमाळ २० (१)
- 1 of 691
- ››