agriculture news in Marathi heat increasing in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाचा चटका वाढतोय 

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

राज्यात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. त्याचबरोबर थंडी कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होईल.

पुणे ः राज्यात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. त्याचबरोबर थंडी कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होईल. शनिवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १२ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा चढत आहे. राज्यासह उत्तर भारतातही कमाल तापमानात वाढ होत आहे. सौराष्ट्र आणि कच्छमधील भूज-रुद्रमाता येथे कमाल तापमानाची नोंद ४० अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. उत्तराखंड, पंजाब, बिहार आणि विदर्भ, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी या भागांत 
कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.

विदर्भात सकाळपासून ऊन वाढत असल्याने झळा चांगल्याच तीव्र होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. चंद्रपूर, अकोला या भागांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तर अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वाशीम या भागांत ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. 

मराठवाड्यातही ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही कडाक्याचे ऊन वाढू लागले आहे. जळगाव येथे ३८.५ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमान नोंदविले गेले असून, सोलापूर, पुणे, मालेगाव भागांतही ऊन वाढत आहे. कोकणातही कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. सांताक्रूझ येथे ३७ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेले आहे. 

शनिवारी (ता.५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रूझ) २३ (३) 
 • ठाणे २२.६ 
 • अलिबाग २१.९ (२) 
 • रत्नागिरी २१५ (१) 
 • डहाणू २१ (१) 
 • पुणे १४.६ (१) 
 • नगर १५.९ 
 • जळगाव १३.४ (-३) 
 • कोल्हापूर १९.५ (१) 
 • महाबळेश्वर १८.१ (२) 
 • मालेगाव १७.४ (३) 
 • नाशिक १५.१ (१) 
 • निफाड १२ 
 • सांगली १७.३ 
 • सातारा १६.४ 
 • सोलापूर १९.६ (-१) 
 • औरंगाबाद १७.२ 
 • बीड १९.३ (३) 
 • परभणी १९ (१) 
 • परभणी कृषी विद्यापीठ १४.८ 
 • नांदेड १७.७ 
 • उस्मानाबाद १९ 
 • अकोला १७.१ (-१) 
 • अमरावती २०.३ (-१) 
 • बुलडाणा १९.२ 
 • चंद्रपूर १७.२ (-२) 
 • गोंदिया १५.६ (-२) 
 • नागपूर १७.४ 
 • वर्धा १७ (-१) 
 • यवतमाळ २१ (२) 

इतर बातम्या
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...