agriculture news in marathi, Heat level increases in State | Agrowon

राज्यभरात उन्हाच्या झळा तीव्र

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

पुणे : वैशाख महिना सुरू असल्याने सूर्य चांगलाच तळपू लागला आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, उन्हामुळे अनेक ठिकाणी लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चढाच आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे ४५.८ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे : वैशाख महिना सुरू असल्याने सूर्य चांगलाच तळपू लागला आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, उन्हामुळे अनेक ठिकाणी लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चढाच आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे ४५.८ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

मराठवाडा व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. पूर्व विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने उन्हाचा चटका सकाळपासून वाढत आहे. या चटक्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ होत आहे. मराठवाड्यातही तापमान वाढलेले आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात तापमान सरासरीच्या दरम्यान आहे. सध्या हवामान कोरडे असल्याने वातावरणातील हवा गरम होत आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होत आहे. येत्या शनिवारपर्यत (ता. १८) विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. 

तेलगंणा ते कोमोरीन परिसर, रायलसीमा आणि तमिळनाडूमध्ये समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तर तमिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या परिसरात असलेले बाष्प ओढून घेतले असून तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, अकोला, यवतमाळ येथे तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यात ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. खानदेशात उन्हाचा चटका कायम आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात उन्हाचा पारा सरासरीएवढा आहे. त्यामुळे उन्हाचा झळा काही प्रमाणात कमी आहे.   

मंगळवार (ता. १४) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.६ (२.१), जळगाव ४२.६ (-०.१), कोल्हापूर ३७.० (०.८), महाबळेश्‍वर ३३.६ (२.७), मालेगाव ४३.८ (३.०), नाशिक ३८.४ (०.१), सांगली ३९.० (१.५), सातारा ३८.५ (१.९), सोलापूर ४२.० (१.३), मुंबई (सांताक्रुझ) ३३.७ (०.३), मुंबई ३३.६ (०.१) अलिबाग ३३.७ (०.८), रत्नागिरी ३३.८ (१.०), डहाणू ३४.७ (०.६), औरंगाबाद ४०.२ (०.४), बीड ४१.६ (१.२), परभणी ४२.८ (०.८), अकोला ४३.६ (१.४), अमरावती ४२.२ (-०.२), बुलढाणा ४०.६ (२.२), ब्रह्मपुरी ४५.६ (३.९), चंद्रपूर ४५.८ (३.२), गोंदिया ४२.२ (०.५), नागपूर ४४.५ (२.३), वाशिम ४२.०, वर्धा ४४.० (१.३) यवतमाळ ४२.५ (०.८).


इतर अॅग्रो विशेष
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...
कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...
शेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...
‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...
कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...
देशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...
थंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
राज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
थकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...
केंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...