वैशाख वणवा वाढणार 

चैत्र संपला असून, वैशाख महिन्याला प्रारंभ झाला आहे. यातच राज्यात उन्हाचा चटका अधिकच तीव्र होत असल्याने वैशाख वणवा वाढणार आहे.
वैशाख वणवा वाढणार 
वैशाख वणवा वाढणार 

पुणे : चैत्र संपला असून, वैशाख महिन्याला प्रारंभ झाला आहे. यातच राज्यात उन्हाचा चटका अधिकच तीव्र होत असल्याने वैशाख वणवा वाढणार आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही तापमानाचा पारा वाढला आहे. आज (ता. २५) उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे व उष्ण हवामान आहे. दुपारच्या वेळी उकाड्यात वाढ होत असल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत विदर्भात सर्वत्र तापमान चांगलेच वाढले असून, अकोल्यासह नागपूर, वाशीम, वर्धा, मराठवाड्यातील परभणी, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे होते. तर बहुतांशी ठिकाणी तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.  विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थती आहे. त्यापासून तेलंगणा, रायलसीमा, दक्षिणण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडूपासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पूर्व भारतासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ४२.०, धुळे ४२.०, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्‍वर ३२.५, मालेगाव ४१.६, नाशिक ३८.१, निफाड ३७.५, सांगली ३८.६, सातारा ३९.१, सोलापूर ४१.४, डहाणू ३३.८, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३४.६, औरंगाबाद ३९.९, परभणी ४२.७, अकोला ४३.४, अमरावती ४१.४, बुलडाणा ४०.३, ब्रह्मपुरी ४१.२, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ४०.०, नागपूर ४२.१, वाशीम ४२.४, वर्धा ४२.०.  बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राचे संकेत  बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्यास पोषक हवामान आहे. महिनाअखेरीस (२९ एप्रिल) अंदमान समुद्रालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. हे क्षेत्र हळूहळू उत्तरेकडे सरकण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे सरकताना ही प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com