agriculture news in Marathi, heat reduce in state, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाचा चटका काहीसा कमी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात काहीशी घट झाली आहे. राज्यातील बहुतांशी शहराचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. दोन ते तीन दिवसांनंतर कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात काहीशी घट झाली आहे. राज्यातील बहुतांशी शहराचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. दोन ते तीन दिवसांनंतर कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.

राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांत अनेक काही भागांत वादळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी हवामान अंशत ढगाळ राहत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसने घटला आहे. 

विदर्भातील वर्धा, अमरावती येथील कमाल तापमानात मोठी घट झाली असून कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन, मध्य महाराष्ट्रात दोन ते चार, कोकणात एक ते दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.  

ढगाळ हवामान व अवकाळी पावसामुळे दिवसाच्या तापमानामुळे रात्रीच्या तापमानातही चांगलीच घट झाली आहे. मराठवाडा, विदर्भात रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्र व कोकणात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. राज्यातील ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे ४० ते ४१ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. उर्वरित भागातील तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

गुरुवारी (ता. १८) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३५.४ (२२.३), नगर (१९.६), जळगाव ३७.० (२२.०), कोल्हापूर ३६.५ (२२.०), महाबळेश्‍वर २९.८ (१५.४), मालेगाव ३६.० (२२.४), नाशिक ३३.१(२०.९), सांगली ३७.७ (१९.४), सातारा ३६.२ (१९.८), सोलापूर ३८.६ (२५.६), सांताक्रुझ ३३.१, अलिबाग ३१.५, रत्नागिरी ३४.३, डहाणू ३३.५, औरंगाबाद ३५.८ (२२.०),  नांदेड ३९.५ (२१.०), परभणी ३८.१ (१९.०), अकोला ३६.९ (२१.५), अमरावती ३५.६ (२०.६), बुलडाणा ३५.६ (२२.४), ब्रह्मपुरी ४०.६ (२४.५), चंद्रपूर ४१.२ (२७.६), गडचिरोली ४०.० (२६.४), गोंदिया ३८.२ (२०.५), नागपूर ३५.९ (२५.०), वर्धा ३६.५ (२४.६), वाशीम ३५.० (२०.०), यवतमाळ ३६.५ (२२.०).

विदर्भात पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र ते कोमोरिन परिसर, मराठवाडा, कर्नाटक व तमिळनाडू या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. तर कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच छत्तीसगड ते झारखंड या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर काही अंशी होणार आहे. त्यामुळे विदर्भात काही भागांत आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

 


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...