राज्यात उन्हाच्या झळा कायम

राज्यात उन्हाच्या झळा कायम
राज्यात उन्हाच्या झळा कायम

पुणे ः गेल्या आठवड्यापासून राज्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या झळा चालू आठवड्यातही कायम आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळी आठवाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूर येथे ३९.४ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रानी सांगितले.  राज्यात गेल्या आठवड्यापासून जवळपास चाळीस अंशापर्यंत कमाल तापमानाचा पारा गेला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, वर्धा, यवतमाळ या भागांतील कमाल तापमान ३९ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे उन्हाचा चटका या भागात चांगलाच वाढला आहे. उर्वरित भागातही उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पुढील काही दिवस हा पारा चांगलाच वाढणार असल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी या भागांतही उन्हाचा पारा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, नगर, पुणे, नाशिक या भागांत अंशत ढगाळ हवामान असल्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी असला तरी जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर या भागांत उन्हाची तीव्रता कायम आहे. विदर्भ, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग आणि मध्य महाराष्ट्र या भागांत समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मराठवाडा व कर्नाटकाचा उत्तर भाग हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता असून रविवारी विदर्भात काही अंशी ढगाळ हवामान राहील.  गुरुवारी (ता. १४) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :   पुणे ३५.६ (१६.०), नगर ३२.४ (१६.६), जळगाव ३५.२ (१९.६), कोल्हापूर ३६.० (२०.४), महाबळेश्‍वर ३१.१ (१७.६), मालेगाव ३७.२ (१८.८), नाशिक ३२.७ (१६.५),  सांगली ३७.० (१७.४), सातारा ३६.३ (१७.४), सोलापूर ३८.९ (२१.६), सांताक्रुझ ३०.६ (१९.४), अलिबाग २८.० (२०.२), रत्नागिरी ३०.६ (२०.२), डहाणू ३०.६ (२०.०), औरंगाबाद ३५.२ (१९.२), बीड ३८.० (२०.५), परभणी ३९.४ (२१.४), नांदेड ३९.५ (१९.०), अकोला ३९.० (२१.४), अमरावती ३९.० (१८.४), बुलडाणा ३२.५ (२१.८), ब्रह्मपुरी ३९.२ (२०.७), चंद्रपूर ३९.४ (२५.४), गडचिरोली ३६.४ (२०.०), गोंदिया ३५.६ (१६.२), नागपूर ३८.५ (२०.७), वर्धा ३९.० (२१.४), वाशिम ३७.८ (२०.२), यवतमाळ ३९.० (१९.८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com