Agriculture news in marathi Heat rise in Khandesh, Temperature at 40 degrees | Agrowon

खानदेशातील उष्णतेत वाढ, तापमान ४० अंशांवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

जळगाव :मागील दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे.

जळगाव : खानदेशात मागील मंगळवारी (ता. १७) व बुधवारी (ता. १८) वादळी पाऊस झाला. आता मागील दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. 

धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे. तर जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद २० अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे.

मागील आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यात पिकांचे नुकसान झाले. शिरपूर, जळगाव, चोपडा या भागांत मोठा फटका बसला आहे. आता मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दिवसा उकाडा वाढला आहे. कमाल तापमानही ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. 

पिकांना पाण्याची गरज

थंडी बायब झाली आहे. दिवसा काहीसा वारा असतो. मध्येच वारा बंद होतो. ढगांची जमवाजमव होते. थंडी कमी झाल्याने उशिराच्या गहू पिकाला फटका बसला आहे. केळी, मका, बाजरी या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची गरजही वाढली आहे. 

विविध संस्थांनी या आठवड्यात खानदेशात पाऊस, गारपिटीची शक्‍यता व्यक्त केली आहे. याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. कारण हरभरा काढणी सुरू आहे. अनेक भागात मका, ज्वारी ही पिके काढणीवर आली आहेत. तर, रावेर, यावल व मुक्ताईनगरातही केळी काढणीवर आहे. विषम वातावरणासह बाजारातील अनिश्‍चित स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता 
वाढत आहे.


इतर बातम्या
मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर आगमुंबई : मुंबईत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावर...
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...