आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
बातम्या
अवकाळी पावसामुळे उकाडा वाढला
पुणे ः दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेशात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या परिसरात अंशत ढगाळ हवामान असून अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे वातावरणात उकाड्यात वाढ होत आहे. विदर्भात, मराठवाड्याच्या काही भागांत आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका जाणवत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानात बदल होत आहे. दिवसभर जाणवत असलेला उन्हाचा चटका कायम असला तरी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामान होत आहे. अचानक झालेल्या बदलामुळे विजांच्या कडकडाटासह, जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत गारवा तयार होत असला तरी दुसऱ्या दिवशी उकाड्यात वाढ होत आहे.
रविवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या काही भागांत हवामान अंशतः ढगाळ होते. मराठवाड्याच्या पूर्व भाग व विदर्भात आकाश निरभ्र होते. त्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या होत्या.
रविवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.२ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या भागांतही सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. मराठवाड्यात कमाल तापमान चांगलेच वाढले असून, कमाल तापमानाचा पारा ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी अधिक असला तरी उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती. कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सातारा या भागातील तापमान ४० अंशांच्या खाली होते. कोकणातही कमाल तापमानात ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
रविवारी (ता. १४) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.९, नगर ४३.४, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३५.४, मालेगाव ४२.०, नाशिक ३९.७, सांगली ४०.०, सातारा ३९.२, सोलापूर ४२.६, सांताक्रुझ ३६.३, अलिबाग ३३.४, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३५.१, औरंगाबाद ४१.३ , बीड ४३.१, नांदेड ४३.०, परभणी ४३.६, उस्मानाबाद ४१.६, अकोला ४४.० (२७.०), अमरावती ४४.० (२५.२), बुलडाणा ४१.१ (२५.६), ब्रह्मपुरी ४४.२ (२५.८), चंद्रपूर ४४.२ (२८.०), गडचिरोली ४१.२ (२५.४), गोंदिया ४०.८ (२१.६), नागपूर ४३.३ (२६.०), वर्धा ४४.२ (२८.४), वाशीम ४२.२ (२५.२), यवतमाळ ४२.८ (२८.०).
- 1 of 1543
- ››