agriculture news in Marathi, heat wave in beed and nagpur, Maharashtra | Agrowon

बीड, नागपूरमध्ये उष्णतेची लाट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे: तापमानात थोडीशी घट झाली असली तरी, राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम आहे. सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये बीड येथे देशातील सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर परभणी, नागपूर, वर्धा येथेही तापमान ४३ अंशांच्या पुढे होते, तर उर्वरित राज्याच्या तापमानात रविवारच्या तुलनेत १ ते २ अंशांची घट झाल्याचे दिसून आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

पुणे: तापमानात थोडीशी घट झाली असली तरी, राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम आहे. सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये बीड येथे देशातील सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर परभणी, नागपूर, वर्धा येथेही तापमान ४३ अंशांच्या पुढे होते, तर उर्वरित राज्याच्या तापमानात रविवारच्या तुलनेत १ ते २ अंशांची घट झाल्याचे दिसून आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी तापमान ४२ अंशांपेक्षा अधिक होते. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा ४३ अंश पार गेल्याचे दिसून आले. मात्र सोमवारी राज्याच्या तापमानात १ ते २ अंशांची घट झाल्याचे दिसून आले. अकोला येथे ४३.६ अंशांवर गेलेले तापमान ४२.१ अंशांपर्यंत खाली आले होते. बुलडाणा वगळता विदर्भात सर्वच ठिकाणी, तर जळगाव,बीड, नांदेड, परभणी येथे तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक होते. 

 सोमवारी (ता. १) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.७ (२.०), धुळे ४०.८, जळगाव ४१.४ (१.८), कोल्हापूर ३५.५ (-१.१), महाबळेश्वर ३३.७ (२.२), नाशिक ३६.५ (-०.१), सांगली ३८.६ (१.०), सातारा ३८.६ (२.८), सोलापूर ४०.६ (१.८), आलिबाग ३६.० (४.७), डहाणू ३३.३ (१.३), सांताक्रूझ ३२.१ (-१.२), रत्नागिरी ३१.८ (०.०), औरंगाबाद ३९.८ (२.७), बीड ४३.५ (५.६), नांदेड ४२.५ (३.६), उस्मानाबाद ३९.६ (२.४), परभणी ४३.० (४.३), अकोला ४२.१ (३.९४), अमरावती ४२.६ (४.०), बुलडाणा ३८.८ (३.३), बह्मपुरी ४१.७ (३.३), चंद्रपूर ४२.८ (३.४), गडचिरोली ४२.० (१.०), गोंदिया ४१.० (३.१), नागपूर ४३.२ (५.१), वर्धा ४३.० (४.२), यवतमाळ ४२.० (४.१). 
 


इतर अॅग्रो विशेष
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
बियाणे कायद्यात होणार सुधारणापुणे : देशाचा जुनाट बियाणे कायदा बदलण्याच्या...
ढगाळ हवामानाचा अंदाजपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...