कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारा

उष्ण लाट
उष्ण लाट

पुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्ण लाट आली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २८) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर कोकण वगळता उर्वरीत राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले आहे. यातच ढगाळ हवामान होत असल्याने उकाडाही जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा यवतमाळ येथे तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. यापैकी काही ठिकाणी उष्ण लाट आली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २८) ही लाट कायम राहणार आहे.  शुक्रवारी (ता. २४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८ (३.६), जळगाव ४४.० (१.७), कोल्हापूर ३८.६(३.७), महाबळेश्वर ३३.६ (४.२), मालेगाव ४४.६ (४.६), नाशिक ३८.३ (०.९), सांगली ४१.० (४.०), सातारा ४०.७ (५.५), सोलापूर ४४.५(४.६), अलिबाग ३३.९ (०.७), डहाणू ३५.२ (०.८), सांताक्रूझ ३३.८ (०.३), रत्नागिरी ३३.३ (०.४), औरंगाबाद ४१.७ (२.५), नांदेड ४४.५ (३.७), परभणी ४५.५ (३.७), अकोला ४५.१ (३.२), अमरावती ४४.८ (३.०), बुलडाणा ४२.० (४.१), बह्मपुरी ४६.३ (३.७), चंद्रपूर ४६.२ (३.०), गोंदिया ४३.० (०.३), नागपूर ४६.२ (३.४), वाशीम ४३.८, वर्धा ४६.० (३.२), यवतमाळ ४४.५(२.८).  उष्ण लाट असलेली ठिकाणे : बह्मपुरी ४६.३, चंद्रपूर ४६.२, नागपूर ४६.२, वर्धा ४६.०, परभणी ४५.५, अकोला ४५.१, मालेगाव ४४.६, सोलापूर ४४.५ सातारा ४०.७.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com