agriculture news in Marathi, heat wave possibility in Vidarbha, central Maharashtra and Marathwada, Maharashtra | Agrowon

विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज उष्ण लाट
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज (ता. १९) उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील सर्वोच्च ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन दिवसांत उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज (ता. १९) उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील सर्वोच्च ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

विदर्भात काही दिवसांपासून उन्हाचा ताप चांगलाच वाढला आहे. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे तापमान ४५ अंशांवर पाेचल्याने उष्णतेची लाट आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा येथेही तापमान ४० अंशांच्या पुढे असून, सरासरीपेक्षा ५ अंशांची वाढ झाल्याने उष्ण लाट आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० पार असल्याने उन्हाच्या झळा असह्य होत आहेत.

बुधवारपर्यंत राज्यात मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर कोकणात बुधवारी (ता. २२) तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता.१८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.४ (२.७), जळगाव ४०.६(-२.१), कोल्हापूर ३९.८ (४.६), महाबळेश्वर ३४.५ (४.८), मालेगाव ४०.८ (०.८), नाशिक ३७.३ (-०.४), सांगली ४०.६ (४.१), सातारा ४०.२ (५.०), सोलापूर ४२.५(२.४), अलिबाग ३२.२ (-०.९), डहाणू ३३.० (-१.२), सांताक्रूझ ३३.९ (०.५), रत्नागिरी ३३.७ (०.८), औरंगाबाद ४०.४ (०.९), नांदेड ४२.५ (१.०), परभणी ४३.८ (२.०), उस्मानाबाद ४१.३ (२.०), अकोला ४३.८ (१.७), बुलडाणा ४०.३ (१.९), बह्मपुरी ४५.६ (३.५), चंद्रपूर ४५.८ (२.८), गोंदिया ४३.४ (१.३), नागपूर ४५.४ (२.७), वाशीम ४२.४, वर्धा ४४.९ (२.२), यवतमाळ ४२.८(१.१). 

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...