agriculture news in marathi, Heat wave prediction in state | Agrowon

राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 मे 2019

पुणे : मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटक या दरम्यान असलेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.  यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी आवश्यक असलेले वातावरण होत आहे. राज्यात उद्या (ता.३१) काही अंशी हवामान ढगाळ राहणार असून शनिवार (ता.१) पासून राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्याचे संकेत आहे. तसेच, बुधवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याची आणि राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  

पुणे : मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटक या दरम्यान असलेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.  यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी आवश्यक असलेले वातावरण होत आहे. राज्यात उद्या (ता.३१) काही अंशी हवामान ढगाळ राहणार असून शनिवार (ता.१) पासून राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्याचे संकेत आहे. तसेच, बुधवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याची आणि राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भाच्या पूर्व भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. या लाटेमुळे उन्हाच्या झळा सकाळपासून तीव्र झाल्या असून कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहणार आहे. यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवणार आहे. दुपारी उन्हाचा झळा तीव्र होणार असून कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. दिवसाच्या तापमानासह रात्रीच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मराठवाड्यातही उन्हाचा चांगलाच चटका आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात उन्हाच्या झळा कमी असल्या तरी उकाड्यात सकाळपासून वाढ झाली आहे. त्यामुळे तापमानात काही अंशी वाढ झाली आहे. 

मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल वातावरण ः 
गेल्या दोन चार दिवसांपासून मॉन्सूनची प्रगती थंडावली होती. मात्र, आता मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल वातावरण तयार होत आहे. आज अंदमान बेटाच्या भागात असलेल्या मॉन्सूनची प्रगती होऊन उद्या (शनिवार) उत्तर अंदमानात दाखल होण्याचे संकेत आहे.

राज्यात ४३ अंश सेल्सिअस तापमान गेलेली प्रमुख शहरे 
बीड, सोलापूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ

बुधवार (ता.२९) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.७ (३.८), जळगाव ४३.६ (१.४), कोल्हापूर ३८.० (३.२), महाबळेश्‍वर ३४.२ (५.७), मालेगाव ४२.४ (३.१), नाशिक ३८.५ (१.५), सांगली ३९.४ (३.२),  सातारा ४१.२ (६.२), सोलापूर ४३.८ (४.३), मुंबई (सांताक्रुझ) ३४.३ (०.८), मुंबई ३४.० (०.१), अलिबाग ३२.७ (-०.६), रत्नागिरी ३३.६ (०.८), डहाणू ३४.६ (०.३), औरंगाबाद ४२.० (३.२), बीड ४४.२ (४.६), परभणी ४६.१ (४.७), नांदेड ४४.५ (३.२), उस्मानाबाद ४३.४ (५.०), अकोला ४५.६ (३.८), अमरावती ४५.८ (३.८), बुलढाणा ४१.७ (४.०), ब्रह्मपुरी ४६.९ (४.१), चंद्रपूर ४७.८ (४.५), गोंदिया ४५.५ (२.७), नागपूर ४७.५ (४.७), वर्धा ४६.५ (३.९) यवतमाळ ४५.० (३.५).

इतर अॅग्रो विशेष
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...