agriculture news in Marathi heat wave prediction in Vidarbha and Marathwada Maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

सुर्य आग ओकायला लागल्याने राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाच्या चटक्याने विदर्भ, मराठवाडा होरपळला आहे, तर उत्तर महाराष्ट्र चांगलाच तापला आहे.

पुणे : सुर्य आग ओकायला लागल्याने राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाच्या चटक्याने विदर्भ, मराठवाडा होरपळला आहे, तर उत्तर महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. रविवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामाचे उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. राज्यात आजपासून (ता.४) उन्हाचा चटका वाढणार असून, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

सकाळपासून असलेला उन्हाचा चटका, दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन, पडणारा वादळी पाऊस अशीच काहीसे हवामान राज्याच्या विविध भागात अनुभवाला मिळत आहे. मात्र पूर्वमोसमी पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाचा चटका अधिकच वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४१ ते ४५ अंशादरम्यान आहे. मराठवाड्यात कमाल तापमान ४१ ते ४४ अंश, मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी ३८ ते ४३ अंश, तर कोकणात ३३ ते ३५ अंशादरम्यान आहे. पुढील गुरूवारपर्यंत (ता.७) राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता.१) दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. मात्र या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्यास प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी ही प्रणाली अधिक ठळक होण्यासाठी गुरूवार (ता.७) उजाडण्याचे संकेत आहेत. त्यानंतर उत्तरेकडे सरकत जाताना हे कमी दाब क्षेत्र आणखी तीव्र होणार असल्याचे हवामान विभागाने रविवारी स्पष्ट केले. 

रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.९, जळगाव ४३.६, धुळे ४३.०, कोल्हापूर ३७.८, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४२.२, नाशिक ३८.९, निफाड ३९.०, सांगली ३८.२, सोलापूर ४२.८, डहाणू ३४.७, सांताक्रूझ ३३.८, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.२, नांदेड ४४.०, अकोला ४४.८, अमरावती ४४.२, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४३.२, चंद्रपूर ४२.५, गोंदिया ४१.६, नागपूर ४३.२, वर्धा ४४.०. 

ऊन तापदायक ठरणारी ठिकाणे 
अकोला ४४.८, परभणी ४४.२, अमरावती ४४.२, नांदेड ४४, वर्धा ४४, जळगाव ४३.६, नागपूर ४३.२, ब्रह्मपुरी ४३.२, धुळे ४३. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...