agriculture news in marathi Heat wave prediction in Vidharbha, rainfall in state from Friday | Page 2 ||| Agrowon

विदर्भात आज उष्णतेची लाट; शुक्रवारपासून राज्यात अवकाळीचा अंदाज

ॲग्रोवन वृत्तसेवा 
बुधवार, 7 एप्रिल 2021

मराठवाडा ते कोमोरीन परिसर आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, मंगळवारपासून (ता. ६) विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे.

पुणे : मराठवाडा ते कोमोरीन परिसर आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, मंगळवारपासून (ता. ६) विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे. आजही विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

दोन दिवसांपासून अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर तेलंगाणा ते तमिळनाडूच्या उत्तर -दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, तमिळनाडूच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ होत आहे. 

मंगळवारी (ता. ६) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.वाढत्या तापमानामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानात मोठी तफावत आढळून येत असून, नागपूर येथे १९.३ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. राज्यातील बहुतांश ठिकाणचा गारठा कमी झाला आहे.

पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसवर सरकला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज आणि उद्या वातावरणात आणखी वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. 

येथे होणार अवकाळी पाऊस :
शुक्रवार - भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
शनिवार - कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ 

मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः

 • शहर --- कमाल तापमान
 • मुंबई (सांताक्रूझ)---३२.७
 • अलिबाग---३१.३
 • रत्नागिरी---३३.२
 • डहाणू---३२.३ 
 • पुणे---३९.६
 • जळगाव---४१.३
 • कोल्हापूर---३९.३ 
 • महाबळेश्‍वर---३२.६
 • मालेगाव---४०.८ 
 • नाशिक---३७.९
 • सांगली---३९.९
 • सातारा---३९.२
 • सोलापूर---४१.७ 
 • औरंगाबाद---४०.१ 
 • परभणी---४०.३
 • नांदेड---४१.५
 • अकोला---४२.५
 • अमरावती---४१.४
 • बुलडाणा---३९.५
 • ब्रम्हपुरी---४३.५ 
 • गोंदिया---४०.२
 • नागपूर---४१
 • वर्धा---४१.१ 

इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...