परभणीत मंगळवारपर्यंत उष्णतेची लाट

परभणीत मंगळवारपर्यंत उष्णतेची लाट
परभणीत मंगळवारपर्यंत उष्णतेची लाट

परभणी : भारतीय हवामान विभागातर्फे जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. २८) उष्णतेची लाट येऊन तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्याबाबत जिल्ह्यातील जनतेने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले.

उष्माघाताची लक्षणे ....

त्वचा कोरडी पडणे, खूप जास्त तहान लागणे, मळमळ होणे, उलटी होणे, थकवा येणे, ताप येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता आदी उष्माघाताची लक्षणे आहेत. याशिवाय उष्माघाताची तीव्रता अधिक असल्यास चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था येते. व्यक्ती कोमामध्ये जाण्याची अथवा दगावण्याची शक्यता असते.

उष्माघाताची कारणे...

उष्ण खोलीमध्ये, तीव्र उन्हामध्ये शारीरिक श्रमाची कामे करणे, गच्च कपडे वापरणे, उष्णतेशी सतत सबंध येणे, उष्ण वातावरणात श्रमाची कामे करणे, तीव्र उन्हाळ्यात पाणी कमी पिणे आदीमुळे उष्माघात होण्याची शक्यता बळावते. अति मद्यप्राशन, अधिक प्रमाणात चहा, कॉफी सारखे पेय पिण्यामुळे शरीरातील पाणी उत्सर्जित होते. त्यामुळेही उष्माघात होऊ शकतो. ५ वर्षांपर्यंतची मुले, ज्येष्ठ नागरिक, श्रम करण्याची सवय नसलेल्या व्यक्ती, श्रम करणारे शेतकरी, उष्णतेच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताचा तडाखा बसू शकतो.

उपाययोजना....

उष्माघात होऊ नये म्हणून सर्व महत्त्वाची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी. अत्यावश्यक कामासाठीच डोके, चेहरा पूर्ण झाकून बाहेर पडावे. सैलसर, सुती, पांढऱ्या रंगाचे कपडे शक्यतो वापरावे, अति व्यायाम करणे टाळावे, उन्हाच्या वेळी बंद गाडीत थांबणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे. शरीरातील क्षारांची कमी भरून काढण्यासाठी लिंबूपाणी, मीठ घ्यावे. कोकम शरबत, उसाचा रस, विविध फळांचे रस, नारळपाणी प्यावे, टरबूज, खरबूज खाणे उपयुक्त आहे. आदी उपाययोजना केल्यास उष्माघात टाळता येणे शक्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com