agriculture news in Marathi heat wave in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात उष्ण लाट 

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

राज्यात उष्ण व कोरडे हवामान असल्याने उन्हाच्या झळा वाढून अंगाची लाही होत आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूरात हंगामात प्रथमच तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्ण लाट आली आहे.

पुणे : राज्यात उष्ण व कोरडे हवामान असल्याने उन्हाच्या झळा वाढून अंगाची लाही होत आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूरात हंगामात प्रथमच तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्ण लाट आली आहे. शनिवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूरात हंगामातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२४) विदर्भातील उष्ण लाट कायम राहणार आहे, तर मराठवाड्यासह उर्वरीत राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्यास त्या भागात उष्ण लाट आल्याचे समजण्यात येते. शनिवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि अकोल्यात ४५ अंशापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर राजस्थानमधील चुरू येथे देशातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील जळगाव, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा येथेही तापमान ४४ अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा झळा असह्य होत आहेत. आज (ता. २४) राज्यात ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ होण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८, धुळे ४३.०, जळगाव ४४.२, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्‍वर ३०.६, मालेगाव ४३.२, नाशिक ३७.९, निफाड ३९.३, सातारा ३८.६, सांगली ३८, सोलापूर ४३.३, डहाणू ३४.६, सांताक्रूझ ३४.५, रत्नागिरी ३४.९, औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.२, नांदेड ४३.५, अकोला ४५.२, अमरावती ४४.२, बुलडाणा ४१.४, ब्रह्मपुरी ४२.५, चंद्रपूर ४५.५, गोंदिया ४४.२, नागपूर ४५.६, वर्धा ४४.५. 

मॉन्सूनची चाल होईना 
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. उत्तरेकडे सरकत जाऊन वादळ निवळल्यानंतर मात्र मॉन्सूनने आणखी चाल केलेली नाही. अम्फानने ओढून नेलेले बाष्प व प्रभावीत केलेले वाऱ्याचे प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनच्या अंदमानातील पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे. तर यंदा केरळात मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार असून, ५ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. 
 
उन्हाचा चटका तापदायक ठरणारी ठिकाणे : नागपूर ४५.६, चंद्रपूर ४५.५, अकोला ४५.२, वर्धा ४४.५, जळगाव ४४.२, परभणी ४४.२, अमरावती ४४.२, गोंदिया ४४.२. 


इतर अॅग्रो विशेष
उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक...
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
काळ्या भाताच्या लागवडी तथ्य तपासूनच...नाशिक : सध्या राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी...
‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारा;...औरंगाबाद : अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य...
बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती...मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश...
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...