agriculture news in Marathi, heat wave will continue, Maharashtra | Agrowon

उष्णतेची लाट कायम राहणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने चटका आणि उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. मंगळवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे; तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.   

पुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने चटका आणि उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. मंगळवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे; तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.   

मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले होते. दोन दिवसांत राज्याच्या तापमानात किंचित घट होत चंद्रपूर वगळता उर्वरित राज्यात तापमान पुन्हा ४२ अंशांच्या जवळपास आले आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी सातत्याने ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोकणात ३२ ते ३४ अंशांदरम्यान आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ४० अंशांच्या आसपास तापमानाची नोंद झाली. बीड येथे तापमान ४२.५ अंशांवर पोचले असून, तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट होती. 

आज (ता. ३) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये; तर उद्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट असणार आहे. रविवारपर्यंत राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटक परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या ढगाळ हवामानासह हलक्या पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 

मंगळवारी (ता. २) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३ (२.२), धुळे ४०.६, जळगाव ४१.८ (१.६), कोल्हापूर ३८.१ (१.१), महाबळेश्वर ३३.८ (२.२), नाशिक ३८.१ (१.०), सांगली ३८.५ (०.४), सातारा ३८.८ (२.६), सोलापूर ४०.६ (१.२), अलिबाग ३२.० (०.१), डहाणू ३२.८ (०.८), सांताक्रूझ ३२.० (-०.९), रत्नागिरी ३२.० (०.१), औरंगाबाद ४०.० (२.४), बीड ४२.५ (४.५), नांदेड ४२.५ (२.८), उस्मानाबाद ४०.४ (२.७), परभणी ४२.६ (३.२), अकोला ४२.१ (२.३), अमरावती ४२.४ (२.६), बुलडाणा ३९.४ (३.२), बह्मपुरी ४१.९ (२.५), चंद्रपूर ४३.४ (२.९), गडचिरोली ४१.६ (-०.४), गोंदिया ४०.८ (१.७), नागपूर ४१.४ (२.२), वाशीम ४२.०, वर्धा ४२.० (२.२), यवतमाळ ४२.० (२.९). 
 

इतर अॅग्रो विशेष
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...
पावसाचा मराठवाड्यात ४१ लाख हेक्‍टर...औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...
रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात...रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच...
दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस'...पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता...सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी...
राज्यात रब्बीसाठी सव्वासहा हजार शेतीशाळापुणे : रब्बी हंगामात राज्यात सव्वासहा...
केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा...पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी,...
बाजार समित्या बरखास्त करणार : केंद्रीय...नवी दिल्ली : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि...
राज्य झाले टॅंकरमुक्त; केवळ बुलडाण्यात...पुणे: मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात...
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार;...औरंगाबाद : गंध आणि चवीसाठी केसर आंब्याची आपली...
किमान तापमानात चढ-उतारपुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर...