Agriculture news in marathi The heat wave will increase in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात उन्हाचा चटका वाढणार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 एप्रिल 2021

राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश कोरडे झाल्याने उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे.

पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर अनेक भागांत मळभ दूर झाले आहे. राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश कोरडे झाल्याने उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

राज्यात साधारणपणे २९ मार्चपासून उन्हाचा चटका वाढला होता. परंतु नऊ एप्रिलपासून वातावरणात पुन्हा वेगाने बदल झाले. त्यामुळे दहा एप्रिलपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन पूर्वमोसमी पावसास सुरुवात झाली. जवळपास आठवडाभर पावसाने चांगलाच दणका दिला असून काही ठिकाणी गारपीट, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या काळात कमाल तापमानाचा पारा वेगाने खाली आला होता. किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. तर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. पुणे येथे सर्वांत कमी १७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. 

अरबी समुद्राचा आग्नेय भाग ते केरळ किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तर उत्तर पश्‍चिम बंगाल व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर विदर्भ व परिसरातही चक्रिय वाऱ्यांची स्थिती असून, ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच ओडिशाच्या दक्षिण व उत्तर परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात वातावरणात पुढील काही दिवसांत चांगलेच बदल होण्याची शक्यता आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...
हरभरा दर पाच हजारांवर अकोला ः यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या...
साठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने घेतला...पुणे ः कोविड १९ साथीच्या तडाख्यात सापडल्याने कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
अन्न प्रक्रियेसाठी ‘थ्री डी प्रिंटिंग’...सर्वसामान्यपणे आपल्याला विविध आकारातील कुकीज,...
मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढण्याची...पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
कापूस बियाणे विक्री एक जूनपासून पुणे ः राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील...
कारखान्यांकडून इथेनॉलचे ३०२ कोटी  लिटर...कोल्हापूर : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल कंपन्या...
मोहफुलांवरील दारूबंदी कायद्याचे निर्बंध...पुणे ः मोहफुलांच्या प्रक्रिया उद्योगातून आदिवासी...
तुरळक ठिकाणी हलक्या सरी पुणे : पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला...
बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिरावले अकोला ः यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. शिवाय...
ठिकठिकाणी गारपीट, पावसाचा दणका पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात...
साखर उद्योगाकडून २५ ऑक्सिजन प्रकल्पपुणेः कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा...
गुरुवारपासून पाऊस वाढणार पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या...
दोन हजार कोटींचा बेदाणा शीतगृहात पडून सांगली ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सांगली-...
दर्जेदार आंब्याला मिळवले बांधावरच ग्राहकपुनर्वसित ठिकाणी मिळालेल्या शेतजमिनी ओसाड...