राज्यात उन्हाच्या झळा असह्य 

सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण लाट आल्याने उन्हाच्या झळा असह्य होत आहेत.
राज्यात उन्हाच्या झळा असह्य 
राज्यात उन्हाच्या झळा असह्य 

पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण लाट आल्याने उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. रविवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूरात हंगामातील नव्या उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२५) विदर्भात उष्ण लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

कमाल तापमान ४५ अंशोपक्षा अधिक असल्यास, तसेच कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे जाऊन तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाल्याचे त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजण्यात येते. त्यानुसार विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया येथे, तर मराठवाड्यातील परभणी, आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. तर बुलडाणा आणि सातारा येथे तापमान ४० अंशापेक्षा अधिक असून, सरासरीपेक्षा ४.५ अशांनी वाढ झाली असल्याने या भागात उष्ण लाट आली आहे. 

रविवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील पिलानी येथे देशातील सर्वोच्च ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूर येथे तापमान राज्यातील उच्चांकी ४६.५ अंशावर गेले आहे. यापुर्वी २६ मे १९५४ रोजी नागपूरात आतापर्यंतच्या उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ अशांपेक्षा अधिक आहे. आज (ता. २५) राज्यात उन्हाचा चटका, ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ होण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८, धुळे ४३.०, जळगाव ४५.०, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४४.४, नाशिक ३८.९, निफाड ४०.१, सातारा ४०.१, सांगली ३९.१, सोलापूर ४४.३, डहाणू ३४.५, सांताक्रूझ ३५.०, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ४२.२, परभणी ४५.४, नांदेड ४४.०, अकोला ४६.०, अमरावती ४५.६, बुलडाणा ४३.०, ब्रह्मपुरी ४४.१, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४५.४, नागपूर ४६.५, वर्धा ४५.५.  उष्ण लाट आलेली ठिकाणे : नागपूर ४६.६, अकोला ४६, चंद्रपूर ४५.६, अमरावती ४५.६, वर्धा ४५.५, गोंदिया ४५.४, परभणी ४५.४, जळगाव ४५, बुलडाणा ४३, सातारा ४०.१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com