agriculture news in Marathi heat weave in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात उन्हाच्या झळा असह्य 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण लाट आल्याने उन्हाच्या झळा असह्य होत आहेत.

पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण लाट आल्याने उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. रविवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूरात हंगामातील नव्या उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२५) विदर्भात उष्ण लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

कमाल तापमान ४५ अंशोपक्षा अधिक असल्यास, तसेच कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे जाऊन तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाल्याचे त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजण्यात येते. त्यानुसार विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया येथे, तर मराठवाड्यातील परभणी, आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. तर बुलडाणा आणि सातारा येथे तापमान ४० अंशापेक्षा अधिक असून, सरासरीपेक्षा ४.५ अशांनी वाढ झाली असल्याने या भागात उष्ण लाट आली आहे. 

रविवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील पिलानी येथे देशातील सर्वोच्च ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूर येथे तापमान राज्यातील उच्चांकी ४६.५ अंशावर गेले आहे. यापुर्वी २६ मे १९५४ रोजी नागपूरात आतापर्यंतच्या उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ अशांपेक्षा अधिक आहे. आज (ता. २५) राज्यात उन्हाचा चटका, ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ होण्याचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८, धुळे ४३.०, जळगाव ४५.०, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४४.४, नाशिक ३८.९, निफाड ४०.१, सातारा ४०.१, सांगली ३९.१, सोलापूर ४४.३, डहाणू ३४.५, सांताक्रूझ ३५.०, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ४२.२, परभणी ४५.४, नांदेड ४४.०, अकोला ४६.०, अमरावती ४५.६, बुलडाणा ४३.०, ब्रह्मपुरी ४४.१, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४५.४, नागपूर ४६.५, वर्धा ४५.५. 

उष्ण लाट आलेली ठिकाणे : नागपूर ४६.६, अकोला ४६, चंद्रपूर ४५.६, अमरावती ४५.६, वर्धा ४५.५, गोंदिया ४५.४, परभणी ४५.४, जळगाव ४५, बुलडाणा ४३, सातारा ४०.१. 


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात...नगर ः फळपिकांत आंबा महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे...
आपले सरकार सेवा केंद्रांची होणार तपासणी पुणे ः पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक...
कृषीमध्ये स्टार्टअप, उद्योजकतेला...नवी दिल्ली: नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि...
बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य...रत्नागिरी ः निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह...
मुंबईसह कोकणात धुवांधार पुणे : कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने...
देशात खरीप पेरणीला वेग नवी दिल्ली: यंदाच्या खरीप हंगामात परेणीने जोर...
सव्वालाख हेक्टरवरून टोळधाडीचे उच्चाटन नवी दिल्ली: सरकारने राजस्थान, मध्य प्रदेश,...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार...
तेरा बियाणे कंपन्यांवर अखेर फौजदारी...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे...
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...