agriculture news in Marathi heat will be continue Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाचा चटका कायम राहणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहतांशी ठिकाणी तापमान तिशीपार गेल्याने चटका असह्य होत आहे. किमान तापमानही १५ अंशांच्या पुढे गेल्याने गारठा नाहीसा झाला आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहतांशी ठिकाणी तापमान तिशीपार गेल्याने चटका असह्य होत आहे. किमान तापमानही १५ अंशांच्या पुढे गेल्याने गारठा नाहीसा झाला आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडून थंड व कोरडे वारे दक्षिणेकडे न आल्याने राज्यात यंदा थंडीचा कडाका कमी आहे. यात पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम, दोन्ही समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, कोकणातही ढगाळ हवामान झाले. यामुळे थंडी कमी होऊन उकाड्यात वाढ झाली.

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यत: निरभ्र हवामान असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत आहे. पहाटेच्या वेळी काही ठिकाणी धुके पडत असल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. १६) नागपूर येथे राज्यातील नीचांकी १२.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ ते २० अंशांदरम्यान पोचले आहे.  

रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८(१५.७), नगर ३५.४, धुळे ३२.०(१३.०), जळगाव ३३.८(१५.०), कोल्हापूर ३२.७(१९.७), महाबळेश्‍वर २९.५(१७.२), मालेगाव ३३.२(१६.२), नाशिक ३२.१(१५.०), निफाड ३२.०(१२.४), सांगली ३४.५(१७.८), सातारा ३३.०(१६.५), सोलापूर ३५.२(२०.०), डहाणू २९.८(१९.२), सांताक्रूझ ३३.३(१९.२), रत्नागिरी ३२.९(१९.३), औरंगाबाद ३२.७(१७.३), परभणी ३३.२(१६.४), नांदेड -(१५.०), अकोला ३४.८(१४.९), अमरावती  ३२.६(१६.६), बुलडाणा ३०.०(१५.२), चंद्रपूर ३३.५(१५.२), गोंदिया ३०.०(१३.४), नागपूर ३२.८(१२.१), वर्धा  ३४.०(१५.६), यवतमाळ ३१.५(१६.४).


इतर अॅग्रो विशेष
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...