agriculture news in Marathi heat will be high this year Maharashtra | Agrowon

यंदा उन्हाळा ठरणार तापदायक

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 मार्च 2020

पुणे: ऐन फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच, यंदाचा उन्हाचा चांगलाच तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यासह देशाचा बहुतांश भाग यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघेल. कारण मार्च ते मेदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या राज्यातील चारही हवामान उपविभागांत उन्हाच्या झळा वाढतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला. 

पुणे: ऐन फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच, यंदाचा उन्हाचा चांगलाच तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यासह देशाचा बहुतांश भाग यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघेल. कारण मार्च ते मेदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या राज्यातील चारही हवामान उपविभागांत उन्हाच्या झळा वाढतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला. 

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे भारतीय हवामान खाते दरवर्षी पावसाबरोबरच हिवाळा आणि उन्हाळ्याचाही अंदाज वर्तविते. ‘मॉन्सून मिशन कॅपल्ड फोर्कास्टिंग सिस्टीम’ (एमएमसीएफएस) हे मॉडेल विकसित केले आहे. त्यातील निरीक्षणांच्या आधारे मार्च ते मेदरम्यान उन्हाळ्याचा हवामान खात्याने जाहीर केला. मार्च ते मे यादरम्यान कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला जाणार आहे. वायव्य, पश्‍चिम आणि मध्य भारत; तसेच दक्षिण भारतातील काही हवामान उपविभागांत यंदा उन्हाचा चटका सर्वाधिक असेल. हा प्रदेश उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघेल.

सर्वाधिक उन्हाच्या झळा
राजस्थानमध्ये उन्हाचा चटका दरवर्षी वाढलेला असतो. या वर्षीही यंदाच्या पश्‍चिम राजस्थानमध्ये कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त उसळी मारेल. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, हमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा एक अंशाहून अधिक वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. 

दिवसा उन्हाचा चटका
विदर्भ दरवर्षी उन्हाच्या चटक्‍यात भाजून निघतो. उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान चाळिशीच्या पुढे जाते. या वर्षीच्या उन्हाळ्यातदेखील या प्रदेशातील कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाणार असून, महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह देशाच्या बहुतांशी भागात हंगामाचे तापमान सरासरीपेक्षा अर्धा ते एक अंशापर्यंत अधिक राहणार असल्याने उन्हाची तीव्रता जाणवेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. देशातील जम्मू आणि काश्‍मीर, हरियाना, चंडीगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, उत्तर कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी, रायलसिमा, केरळ हे प्रदेशदेखील उन्हाच्या चटक्‍याने तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रात्री उकाडा वाढणार
सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडल्याने दिवसाच्या तापमान वाढ होण्याची शक्‍यता वर्तवत असतानाच रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाईल, असा अंदाज हवामान खात्याला दिला. देशात किमान तापमानाचा पारा वाढल्याने रात्रीचा उकाडाही वाढेल, असे यातून स्पष्ट होते. उत्तराखंड येथे याचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्‍यता असून, त्याखालोखाल कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हिरयाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकाचा किनारपट्टीय भाग, केरळ येथेही किमान तापमानाचा पारा अर्धा ते एक अंशाने वाढणार असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटा
महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या हवामान उपविभागांबरोबरच देशात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीय भाग येथे उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे. यंदाच्या उन्हाळ्यात देशात मार्च ते मेदरम्यान येणाऱ्या उष्णतेच्या लाटेत कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढण्याची शक्‍यता ४३ टक्के आहे.

एल-निनो स्थिती सर्वसामान्य
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्रात सध्या उष्ण, मात्र सर्वसामान्य एल-निनो स्थिती आहे. ‘मॉन्सून मिशन कॅपल्ड फोर्कास्टिंग सिस्टीम’ या मॉडेलनुसार प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होणार असून, उन्हाळा हंगामात सर्वसामान्य एल-निनो स्थिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...