agriculture news in Marathi heat will be increased in Kokan Maharashtra | Agrowon

कोकणात यंदा उन्हाचा पारा चढणार 

संदीप नवले
बुधवार, 3 मार्च 2021

राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यंदा कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या किमान तापमानाचा पाराही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यंदा कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या किमान तापमानाचा पाराही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह, कोकणातील नागरिकांचा चांगलाच घाम निघणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका जाणवणार असला, तरी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. 

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत २०१६ पासून उन्हाळा आणि हिवाळा हंगामात उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर केला जातो. ‘मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम’ प्रारूपाच्या (मॉडेल) आधारे हवामान विभागाने मार्च ते मे २०२१ या तीन महिन्यांतील तापमानाचा अंदाज सोमवारी (ता. १) जाहीर केला आहे. 

या अंदाजानुसार उन्हाळ्यात उत्तर, वायव्य आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये उन्हाच्या झळा वाढणार आहेत. तसेच पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगडसह पश्‍चिम किनाऱ्यावरील कोकण, गोव्यात कमाल तापमान सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे. कोकण-गोवा विभागात रात्रीच्या किमान तापमानाचा पारा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

‘‘उत्तर, वायव्य, ईशान्य भारतातील सर्वच विभागांसह, पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, पश्‍चिम किनाऱ्यावरील गुजरात, सौराष्ट्र, कोकण-गोवा या विभागांत कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतासह लगतच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या मध्य भारतातील विभागांत दिवसा कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे,’’ असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील रात्रीच्या किमान तापमानाचा विचार करता, हिमालय पर्वताचा पायथ्यासह उत्तर भारत, वायव्य भारत, मध्य भारताचा पश्‍चिम भाग (कोकण-गोवा), दक्षिण भारताच्या किनारपट्टीय भागात किमान तापमान सरासरीच्या वर राहणार आहे. तर पूर्व, मध्य भारतातील बहुतांशी विभागांसह, जम्मू- काश्मीर राज्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

प्रशांत महासागरात ला-निना स्थिती 
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असून, या भागात सध्या मध्यम ला-निना स्थिती आहे. उन्हाळ्यातही या भागात ला-निना स्थिती टिकून राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दरनगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा...
पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी...जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे...
‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढपुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या...
खरीप, रब्बी पिकांसाठी पीककर्ज निश्चितीअमरावती : यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी...
बाजार समित्या टाकणार ‘कात’पुणे : पणन सुधारणांमुळे होणाऱ्या संपूर्ण...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः...पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी...
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे...बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी...