agriculture news in Marathi, heat will increase in state, Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी पाऊस थांबल्यानंतर सूर्य पुन्हा तळपू लागला आहे. उन्हाचा चटका वाढून राज्याच्या कमाल तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर राजस्थान आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. 

पुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी पाऊस थांबल्यानंतर सूर्य पुन्हा तळपू लागला आहे. उन्हाचा चटका वाढून राज्याच्या कमाल तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर राजस्थान आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. 

राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी ४० अंशांच्या जवळपास तापमान पोचले असून, अकोल्यासह अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.  

सोमवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६ (०.६), जळगाव ४०.८ (-१.१), कोल्हापूर ३६.६ (-०.७), महाबळेश्वर ३२.५ (०.४), मालेगाव ४१.२ (०.९), नाशिक ३७.७ (-१.१), सांगली ३७.७ (-१.१), सातारा ३७.४ (०.२), सोलापूर ४०.४(०.०), अलिबाग ३३.७ (१.८), डहाणू ३३.० (०.०), सांताक्रूझ ३२.५ (-०.५), रत्नागिरी ३३.० (०.७), औरंगाबाद ३९.० (-०.१), परभणी ४१.९ (०.८), उस्मानाबाद ४०.१ (१.०), बीड ४०.० (०.३), अकोला ४२.२ (०.७), अमरावती ४१.६ (०.१), बुलडाणा ३९.२ (१.३), बह्मपुरी ४१.७ (०.७), चंद्रपूर ४०.५ (-१.७), गोंदिया ३८.५ (-२.५), नागपूर ३९.५ (-१.६), वर्धा ४१.२ (-०.३), यवतमाळ ३९.५(-१.४). 

कमी दाब क्षेत्राचे संकेत
बंगालच्या उपसागरात गुरुवारी (ता. २५) श्रीलंकेच्या दक्षिणेकडील समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. शनिवारपर्यंत (ता. २७) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंका ओलांडून तमीळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...