agriculture news in Marathi heat will increase in state Maharashtra | Agrowon

उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या चटक्यात होरपळून निघेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता.३०) जाहीर केला आहे.

पुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या चटक्यात होरपळून निघेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (ता.३०) जाहीर केला आहे. महाराष्ट्रात एप्रिल ते जून या कालावधीत राज्यात सरासरी तापमानात अर्धा ते एक अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मरठवाड्यात उष्णतेच्या लाटा येतील असा इशारा देण्यात आला आहे. 

भारतीय हवामान विभागातर्फे गेल्या चार वर्षांपासून पावसाबरोबरच उन्हाळा आणि हिवाळ्याचाही अंदाज वर्तवित आहे. मॉन्सून मिशन कपल्ड फोर्कास्टिंग सिस्टिम या आधारावर देशातील ३६ हवामान उपविभागातील उन्हाळ्याच्या एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा अंदाज सोमवारी जाहिर केला. एप्रिल ते जून या तिनही महिन्यांमध्ये देशातील बहुतांश भागात दिर्घकालीन सरासरीच्या तुलनेत कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढलेला असेल, असा निष्कर्ष मॉन्सून मिशनच्या माहितीच्या विश्लेषणावरून हवामान शास्त्रज्ञांनी काढला आहे.
 
दिवसा चटका
मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, कोकण-गोवा, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी, रायलसिमा, केरळ, पूर्व आणि पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या हवामान उपविभागात उन्हाचा चटका वाढणार आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या ते एक अंश सेल्सिअसने वाढेल

रात्रीचा उकाडा
पूर्व राजस्थान आणि गुजरात या भागात रात्रीच्या तापमान सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त नोंदले जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, विदर्भ, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी यासह उत्तर भारतातील बहुतां हवामान उपविभागात किमान तापमानाचा पारा अर्धा ते एक अंश सेल्सिअसने वाढेल, असेही या हवामान अंदाजात म्हटले आहे. 

उष्णतेच्या लाटेचा इशारा
महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ असे हवामान उपविभाग आहेत. यापैकी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट निर्माण होते. यंदाही या उष्णतेच्या लाटा निर्माण होतील. एप्रिल ते जून या दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा रहाण्याची शक्यता ४० टक्के असल्याचेही खात्याने या अंदाजात स्पष्ट केले आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा तेलंगणा या राज्यांमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट परसते. 

एलनिनोत बदल नाही
विषुवृत्ताच्या प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या एलनिनोमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तो स्थिर आहे. पुढील तीन महिने या स्थितीत कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...