agriculture news in Marathi heat will increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाचा ताप वाढणार; ढगाळ हवामानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 मार्च 2020

पुणे: मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पुढील काळात उन्हाचा ताप वाढत जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) राज्यात आकाश ढगाळ राहून, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे: मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पुढील काळात उन्हाचा ताप वाढत जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) राज्यात आकाश ढगाळ राहून, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेश आणि कर्नाटक किनारपट्टीलगत दोन चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या दोन्ही स्थिती दरम्यान, महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे.

कमाल तापमानात वाढ होत असली तरी किमान तापमानात मात्र चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी (ता. २) उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस, अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याचे कमाल तापमान, उकाड्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. 

सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.८ (१५.७), नगर - (१५.५), धुळे ३४.६ (१३.०), जळगाव ३५.६ (१७.०), कोल्हापूर ३३.८ (२१.०), महाबळेश्‍वर २९.५ (१६.४), मालेगाव ३५.६ (१७.३), नाशिक ३३.२ (१४.७), निफाड ३१.० (१०.५), सांगली ३४.८ (१९.२), सातारा ३३.८ (१७.८), सोलापूर ३४.६ (१९.८), डहाणू २९.० (१९.३), सांताक्रूझ ३२.१ (१७.०), रत्नागिरी - (२०.४), औरंगाबाद ३२.८(१७.०), परभणी ३५.६.


इतर अॅग्रो विशेष
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...