agriculture news in Marathi heat will increased in state Maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाचा चटका वाढणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

उन्हाच्या झळा वाढू लागल्याने राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. यातच गुरूवारपर्यंत (ता.२) बहुतांशी भागात मुख्यत: उष्ण व दमट हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे.

पुणे: उन्हाच्या झळा वाढू लागल्याने राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. यातच गुरूवारपर्यंत (ता.२) बहुतांशी भागात मुख्यत: उष्ण व दमट हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (ता.३) विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस दोन दिवस उघडीप देण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहून उकाडा वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.३०) सकाळपासूनच उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्यानंतर सांयकाळी विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. 

राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव येथे तापमान ३९ अंश, तर मालेगाव, सांगली, परभणी, चंद्रपूर येथे ३८ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदले गेले.

किमान तापमानात वाढ झाल्याने रात्री उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्िथती आहे. त्यापासून मराठवाडा दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. शुक्रवारी (ता.३) विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२ (१९.३), जळगाव ३९.० (२१.६), कोल्हापूर ३६.८ (२४.४), महाबळेश्‍वर ३१.१ (१९.५), मालेगाव ३८.८ (२२.४), नाशिक ३६.८ (१९.२), निफाड ३५.२ (१६.२), सांगली ३८.२(२३.६), सातारा ३७.३(२३.१), सोलापूर ३९.९ (२४.५), डहाणू ३३.१ (२१.५), सांताक्रूझ ३३.४ (२३.२), रत्नागिरी ३२.४ (२३.३), औरंगाबाद ३५.७ (१९.४), परभणी ३८.८ (१९.९), अकोला ३७.७(२२.६), अमरावती ३६.६ (२१.०), बुलडाणा ३५.६ (२१.६), ब्रह्मपूरी ३४.८ (२३.१), चंद्रपूर ३८.५ (१९.०), गोंदिया ३४.४ (२१.२), नागपूर ३५.८ (२२.४), वर्धा ३४.४ (२१.२). 
 

 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...