उन्हाचा चटका तापदायक; पूर्व विदर्भात तुरळक पावसाची शक्यता

राज्याच्या विविध भागात मुख्यतः: निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत आहे. तापमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.
उन्हाचा चटका तापदायक; पूर्व विदर्भात तुरळक पावसाची शक्यता
उन्हाचा चटका तापदायक; पूर्व विदर्भात तुरळक पावसाची शक्यता

पुणे : राज्याच्या विविध भागात मुख्यतः: निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत आहे. तापमानाचा पारा सातत्याने चढता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले आहे. शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २६) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची, तर उर्वरित राज्यात हवामान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मागील आठवड्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यात मुख्यतः: कोरडे व उष्ण हवामान होत आहे. उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वाशीम, वर्धा, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, सोलापूर येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, कर्नाटक, दक्षिण अंतर्गत तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत पावसाला पोषक हवामान आहे. 

शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ४१.४, धुळे ४१.२, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.३, निफाड ३७.६, सांगली ३९.०, सातारा ३९.०, सोलापूर ४२.१, डहाणू ३४.५, सांताक्रूझ ३४.९, रत्नागिरी ३३.५, औरंगाबाद ३९.२, परभणी ४२.४, नांदेड ४२.५, अकोला ४२.९, अमरावती ४२.०, बुलडाणा ३९.७, ब्रह्मपुरी ४१.७, चंद्रपूर ४०.०, गोंदिया ४०.४, नागपूर ४२.१, वाशीम ४२.४, वर्धा ४२.४.  कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकणार  बंगालच्या उपसागराच्या गुरूवारपर्यंत (ता.३०) दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे सरकत जाणारे हे कमी दाब क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. या काळात अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही प्रणाली म्यानमार, बांग्लादेशाकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com