agriculture news in Marathi heat will increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाचा चटका, उकाडा वाढणार; अकोला ४४.८ अंशांवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मे 2020

राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. आजपासून (ता.२०) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार आहे.

पुणे: राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. आजपासून (ता.२०) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार आहे. तर उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ होणार आहे. विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरीत भागातही उन्हाचा चटका वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशी पार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निवळल्याने आजपासून (ता. २०) राज्याच्या बहुतांशी भागात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२, धुळे ४२.०, जळगाव ४३.३, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्‍वर २८.९, मालेगाव ४०.०, नाशिक ३७.३, निफाड ३७.०, सांगली ३७.३, सातारा ३५.५, सोलापूर ४१.०, डहाणू ३४.६, सांताक्रूझ ३३.९, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४०.०, परभणी ४१.८, नांदेड ४०.५, अकोला ४४.८, अमरावती ४१.०, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४१.५, गोंदिया ४१.६, नागपूर ४३.०, वर्धा ४२.८. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...