agriculture news in Marathi heat will increased in state Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका ठरणार तापदायक 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तापमान ४४ अंशापार गेले आहे. शुक्रवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तापमान ४४ अंशापार गेले आहे. शुक्रवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर तापमानाचा पारा ४४ अंशापेक्षा अधिक असल्याने जळगाव, अकोला, चंद्रपूरही भाजून निघाले आहे. आज (ता.२३) विदर्भातील अकोला, नागपूर आणि चंद्रपूरात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. उर्वरीत राज्यातही ऊन तापदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेचा ताप वाढला आहे. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे देशातील आतापर्यंच्या उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे, मालेगाव, सोलापूर, परभणी, गोंदिया, वर्धा येथेही ४३ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. आज (ता.२३) राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर राज्यात ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.२, धुळे ४३.०, जळगाव ४४.४, कोल्हापूर ३४.०, महाबळेश्‍वर २९.९, मालेगाव ४२.८, नाशिक ३८.२, निफाड ३९.०, सातारा ३७.६, सांगली ३६, सोलापूर ४३.०, डहाणू ३४.८, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ४०.८, परभणी ४३.९, नांदेड ४२.५, अकोला ४४.२, अमरावती ४२.६, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४१.५, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४३.०, नागपूर ४४.५, वर्धा ४३.२. 

मॉन्सून जैसे थे 
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. गुरूवारी हे वादळ निवळल्यानंतर शुक्रवारी उत्तर बांग्लादेश आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होते. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. शुक्रवारी (ता.२२) मॉन्सूनची काणतीही प्रगती झाली नसल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...