agriculture news in Marathi heat will remain constent Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका कायम; पूर्व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

पूर्वमोसमी पावसाने उघडीप देताच राज्यातील उन्हाचा ताप, उकाडा वाढला आहे. राज्याच्या अनेक भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

पुणे : पूर्वमोसमी पावसाने उघडीप देताच राज्यातील उन्हाचा ताप, उकाडा वाढला आहे. राज्याच्या अनेक भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. तर पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली घसरला होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर मराठवाड्यातील परभणी, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मालेगाव, सोलापूरात तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. 

विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थती आहे. त्यापासून मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. पूर्व विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

गुरूवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.८, जळगाव ४१.०, धुळे ४१.२, कोल्हापूर ३६.५, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४०.२, नाशिक ३७.८, निफाड ३८.०, सांगली ३८.०, सातारा ३८.६, सोलापूर ४१.३, डहाणू ३४.८, सांताक्रूझ ३३.७, रत्नागिरी ३३.९, औरंगाबाद ३८.८, परभणी ४१.९, अकोला ४२.०, अमरावती ४०.०, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४१.०, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.२, वाशीम ४०.०, वर्धा ४१.२.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...