agriculture news in marathi, Heatwave alert for Vidharbha, Marathwada region | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

पुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

‘वायू’ चक्रीवादळ रविवारी गुजरातच्या किनाऱ्यापासून दूर गेले होते. या वादळाबरोबरच अरबी समुद्रातील बाष्प खेचून नेले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात पूर्वमोसमीच्या सरी थांबल्या आहेत. कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. मात्र, ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील तापमान कमी झाले आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून, मराठवाडातही लाटेची स्थिती आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड येथे उष्ण लाट आली आहे. 

रविवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.१ (१.०), जळगाव ४०.२ (२.७), कोल्हापूर ३१.२(२.२), महाबळेश्वर २१.१ (-१.०), मालेगाव ३९.० (३.९), नाशिक ३१.४ (-१.३), सांगली ३२.४ (१.८), सातारा ३०.६ (१.१), सोलापूर ३७.३ (३.५), अलिबाग ३१.७ (०.६), डहाणू ३३.१ (०.६), सांताक्रूझ ३३.९ (२.०), रत्नागिरी ३१.८ (१.९), औरंगाबाद ३६.० (२.५), परभणी ४०.७ (५.४), नांदेड ४२.० (५.६), अकोला ४२.३ (५.४), अमरावती ४१.२ (४.३), बुलडाणा ३९.० (५.७), ब्रह्मपुरी ४४.३ (७.४), चंद्रपूर ४४.०(६.९), गोंदिया ४३.०(५.४), नागपूर ४३.२ (५.८), वाशिम ४०.६, वर्धा ४२.५ (५.६), यवतमाळ ४०.८(४.८). 

रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)   कोकण : ठाणे २६, किहीम २१, सरल ३१, उरण ६३, कापरोली ६१, जसइ ५९, देव्हरे २८.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी १४, बामणोली ३५, हेळवाक १५, तापोळा १३, लामज २८.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...