agriculture news in marathi, Heatwave strikes again in Vidarbha region | Agrowon

अकोला, ब्रह्मपुरीत उष्णतेची लाट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

पुणे : उन्हामुळे अंगाची काहीली होत असतानाच रविवारी (ता. ६) दुपारनंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत दुपारी तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात सायंकाळनंतर पूर्वमोसमीच्या सरी कोसळल्या. तर विदर्भात उन्हाचा चटका वाढत, सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, ब्रह्मपुरी येथे उष्णतेची लाटेसह देशातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : उन्हामुळे अंगाची काहीली होत असतानाच रविवारी (ता. ६) दुपारनंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत दुपारी तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात सायंकाळनंतर पूर्वमोसमीच्या सरी कोसळल्या. तर विदर्भात उन्हाचा चटका वाढत, सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, ब्रह्मपुरी येथे उष्णतेची लाटेसह देशातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किनारपट्टीलगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कर्नाटक परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने या भागात ढग गोळा होत आहेत. सोमवारी दुपारनंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात ढग गोळा झाले होते. तसेच लातूर, नांदेड, वाशिम जिल्ह्यातही अंशत: ढगाळ हवामान होते.

उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे पारा ४४ अंशांच्या असपास आहे. गुरुवारपर्यंत (ता. १०) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान राहणार आहे. तर विदर्भात अालेली उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.३, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४४.४, नाशिक ३९.३, सांगली ३९.९, सातारा ४०.१, सोलापूर ४२.६, मुंबई ३४.२, अलिबाग ३६.४, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३४.७, औरंगाबाद ४१.६, परभणी ४४.०, नांदेड ४३.०, अकोला ४५.१, अमरावती ४४.०, बुलडाणा ४१.५, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४२.५, नागपूर ४३.७, वर्धा ४४.९, यवतमाळ ४३.५.

इतर अॅग्रो विशेष
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...