मका नाव नोंदणीसाठी रात्रीपासून रांग

यंदाच्या हंगामात भरडधान्य खरेदीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून, मक्याची नाव नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी रविवारी (ता. १) रात्रीपासूनच केंद्राच्या आवारात मुक्काम ठोकल्याचा प्रकार समोर आला.
maize
maize

बुलडाणा ः यंदाच्या हंगामात भरडधान्य खरेदीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून, मक्याची नाव नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी रविवारी (ता. १) रात्रीपासूनच केंद्राच्या आवारात मुक्काम ठोकल्याचा प्रकार समोर आला. थंडीच्या दिवसांत शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र उघड्यावर काढली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरडधान्य खरेदी २ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात केली जाणार आहे. यासाठी मोताळा येथे किंमत आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत एफएक्यू दर्जाचा मका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी सोमवारपासून नावनोंदणी  करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांनी रविवारी (ता. एक) रात्री उशिरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रांग लावली. भरडधान्य योजनेअंतर्गत संकरित ज्वारी २६२०, मालदांडी ज्वारी २६४०, बाजरी २१५० आणि मका १८५० रुपये क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे.  गेल्या हंगामात नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी न झाल्याने अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पहिल्याच दिवसापासून केंद्रावर गर्दी सुरू केली. नाव नोंदणीसाठी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com