Agriculture news in Marathi, Heavy loss of crops of the district due to rain | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नाशिक : जिल्ह्यात गेल्या १२ दिवसांत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेले असून, चार हजारांवर विस्थापित झालेली कुटुंबे निवारा शेडमध्ये आश्रयाला आहेत. धरण क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून, २७ हजारांहून अधिक क्‍युसेकने विसर्ग सुरूच आहे. पूरस्थिती थोडी कमी झाली असली, तरी प्रश्न सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर पूर कायम असलेल्या भागात नुकसानीचे पंचनामे होणे बाकी आहेत.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या १२ दिवसांत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेले असून, चार हजारांवर विस्थापित झालेली कुटुंबे निवारा शेडमध्ये आश्रयाला आहेत. धरण क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून, २७ हजारांहून अधिक क्‍युसेकने विसर्ग सुरूच आहे. पूरस्थिती थोडी कमी झाली असली, तरी प्रश्न सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर पूर कायम असलेल्या भागात नुकसानीचे पंचनामे होणे बाकी आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर बुधवार (ता. ७) पासून पूर कमी झालेल्या भागात पंचनाम्यांना सुरवात झाली. त्यामुळे बाधित झालेल्या कुणालाही निवारा शेडमधील भोजन व्यवस्था वगळता कुठल्याही प्रकारची शासकीय मदत मिळालेली नाही. अजूनही बराच भाग पाण्यात असल्याने नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट व्हायला आणखी दोन दिवस लागतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

गंगापूर, दारणा आणि पालखेड अशा तिन्ही प्रमुख समूहांतील धरणालगतच्या दीडशेहून अधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव, पेठ या पाच तालुक्‍यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये पुरामुळे कोलमडलेली वीज व पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत झालेली नाही. 

नांदूर मध्यमेश्‍वर धरणातून २९ हजार ५९४ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असून, विस्थापितांच्या व्यवस्थेत व्यस्त यंत्रणेकडून अजून पूर्ण क्षमतेने पंचनामे झाले नसून, याबाबत कामकाज संथगतीने सुरू आहे.

परीक्षा पुढे ढकलल्या
पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर या पदांसाठी येत्या १० ऑगस्टपासून राज्यभरात ‘महापरीक्षा’द्वारे परीक्षा पार पडणार होत्या. नाशिक जिल्ह्यात या परीक्षा १३ ऑगस्ट रोजी पार पडणार होत्या. मात्र, अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे पूरस्थितीशी सामना करत आहे, जनजीवन विस्कळित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महापरीक्षाचे प्रकल्प व्यवस्थापक दिनेश पाटील यांना शासनाने पत्र पाठवत नियोजित सर्व परीक्षा १९ ऑगस्टनंतर घेण्याचे आदेश दिले आहेत.

पाच तालुक्‍यांना पुराचा फटका
जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांना पुराचा फटका बसला आहे. त्यात निफाड दोन हजार ५२२, नाशिक ३ हजार ३९, बागलाण ३४५, मालेगाव ३६, पेठ १३ यांसह लहान-मोठ्या गावांत एकूण पाच हजार ६४० कुटुंबे बाधित झाली आहेत.


इतर बातम्या
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...