Agriculture news in Marathi Heavy pre-monsoon rain in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी जोरदार वारा व ढगाच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता. धरण क्षेत्रातही पावसाच्या सरी कोसळ्याने खरीप हंगामाच्या तयारी सुरू झाली आहे.

पुणे ः जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी जोरदार वारा व ढगाच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता. धरण क्षेत्रातही पावसाच्या सरी कोसळ्याने खरीप हंगामाच्या तयारी सुरू झाली आहे.

सध्या मॉन्सूनची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यातच हवामान विभागानेही चांगल्या पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात रविवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन पावसाचे वातावरण तयार झाले. सायंकाळी काळेकुट्ट ढग भरून आल्याने पुणे शहरातील वडगाव, कात्रज या भागात पावसाने दमदार हजेरी लावली.

सोमवारी पहाटेही पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर, दौंड, शिरूर, हवेली, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांसह पूर्व पट्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे काढून ठेवलेल्या उन्हाळी बाजरीचे काही प्रमाणात नुकसान झाले. तर जोरदार वाऱ्यामुळे ऊस पिके पडली. काही ठिकाणी भाजीपाला, आंब्याचेही नुकसान झाले.

पश्चिम पट्यातील घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरात ५८ मिलिमीटर पाऊस पडला. तर गुंजवणी ४६ मिलिमीटर, नाझरे ४४ मिलिमीटर, आंध्रा धरणाच्या परिसरात ३७ मिलिमीटर, नीरा देवधर ३६, विसापूर ३०, येडगाव २१, मुळशी २०, वडज १३, डिंभे १०, चिल्हेवाडी पाच, कासारसाई पाच, भाटघर चार, वीर धरणाच्या कार्यक्षेत्रात एक मिलिमीटर पाऊस पडला.

या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. याशिवाय पूर्वेकडे असलेल्या उजनी धरणाच्या परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे. यामुळे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी तर भात पट्यातील शेतकरी भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीला लागला आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...