Agriculture news in marathi, Heavy rain in 11 circles of Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४ मंडळात शुक्रवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात जवळपास सर्वदूर पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. मराठवाड्यातील ११ मंडळांत ६५ मिलीमिटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. बहुतांश भागात दमदार पडलेला हा पाऊस दिलासादायक ठरला. असाच पाऊस कायम रहावा, पाणीसाठ्याची स्थिती सुधारावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४ मंडळात शुक्रवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात जवळपास सर्वदूर पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. मराठवाड्यातील ११ मंडळांत ६५ मिलीमिटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. बहुतांश भागात दमदार पडलेला हा पाऊस दिलासादायक ठरला. असाच पाऊस कायम रहावा, पाणीसाठ्याची स्थिती सुधारावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६४ मंडळांत पावसाची हजेरी लागली. यामधील ३८ मंडळात ३० ते ६४ मिलीमिटर दरम्यान पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते ३० मिलीमिटर दरम्यान पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४८ मंडळात पाऊस झाला. त्यापैकी २८ मंडळांत २० ते ५५ मिलीमिटर दरम्यान पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते २० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. दोन्ही जिल्ह्यातील मंडळांमध्ये झालेला पाऊस अपवाद वगळता मध्यम ते दमदार स्वरूपाचा होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पिरबावडा व पैठण या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळात पाऊस झाला. त्यापैकी २७ मंडळात तो २० ते ६० मिलीमिटर दरम्यान राहिला. परभणी, पालम तालुक्‍यात पावसाचा अधिक जोर दिसून आला. जिल्ह्यातील बनवस, पूर्णा, चुडावा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातही सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील ३० मंडळांपैकी साखरा व हत्ता मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोली व कळमनुरी तालुक्‍यात मात्र तुरळक ते हलक्या सरी आल्या. ९ मंडळात २० ते ६० मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली.  

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ७५ मंडळात हलका, मध्यम पाऊस झाला. यापैकी २७ मंडळात २० ते ६३ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. जिल्ह्यातील अर्धापूर व लिंबगाव मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडळांत  हलका ते मध्यम पाऊस झाला. २० मंडळांत २० ते ५५ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. आष्टी तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्‍यातील धामनगाव व दौलावडगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद घेतली गेली.

लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील मंडळ वगळता ५३ पैकी २९ मंडळातच पावसाची नोंद झाली. त्यापैकी १० मंडळांत २० ते ५९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.  
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३६ मंडळातं पाऊस झाला. १३ मंडळांत २० ते ५६ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. भूम व कळंब तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. उमरगा तालुक्‍यातील मुरूम तालुक्‍यात झालेला एका मंडळातील तुरळक पाउस वगळता इतर मंडळात पावसाचा थेंब नव्हता. 

अधिक पावसाची मंडळे (मि.मी)

 •  पिरबावडा.............७०
 •  पैठण..................७२
 •  बनवस................११०
 •  पूर्णा...................६६
 •  चुडावा................८९
 •  साखरा................६७
 •  हत्ता...................९७
 •  लिंबगाव...............८१
 •  अर्धापूर................८५
 •  धामणगाव.............६६
 •  दौलावडगाव...........७१

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...