अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती; वडनेरे समिती अहवाल सादर

अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढत गतवर्षी भीमा व कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला.
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती; वडनेरे समिती अहवाल सादर
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती; वडनेरे समिती अहवाल सादर

मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष काढत गतवर्षी भीमा व कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी नक्कीच या अहवालाचा उपयोग होईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री वडनेरे, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव अतुल कपुले उपस्थित होते. भीमा व कृष्णा खोऱ्यात सन २०१९ मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण करून कारणे शोधणे, भविष्यात पुराची दाहकता कमी करणेस्तव तांत्रिक उपाययोजना, धोरणे सुचविणे, कर्नाटकातील अलमट्टी व इतर जलाशयांमुळे महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण होते किंवा कसे, हे जलशास्त्रीय अभ्यासाद्वारे स्पष्ट करणे. याविषयक अभ्यासासाठी शासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने तब्बल २६ बैठका घेत पूरप्रवण भागांना भेटी देऊन तांत्रिक बाबींवर चर्चा करत विविध अंतर्गत अभ्यासगट नेमून सखोल अभ्यास करत हा विस्तृत अहवाल तयार केला आहे.   २३ ऑगस्ट २०१९ मध्ये शासनाने निवृत्त प्रधान सचिव (जलसंपदा) यांचे अध्यक्षतेखाली भारतीय हवामान खाते, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, केंद्रीय जल आयोग, महाराष्ट्र सुंदूर संवेदना उपयोगिता केंद्र, आय.आय.टी., मुंबई मजनिप्रा मधील तज्ञ, जलतज्ञ व जलसंपदा विभागातील सचिव यांची अभ्यास समिती गठित केली होती.   अहवालातील ठळक बाबी पुराची कारणमीमांसा

  • कृष्णा खोऱ्यातील विस्तृत पाणलोट क्षेत्रात अत्यल्प काळात झालेली सातत्यपूर्ण अतितीव्र पर्जन्यवृष्टी
  • पूरप्रवण भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती व नदीची रचना.
  • पूर प्रवण क्षेत्रात नागरीकरण, बांधकामे, अतिक्रमणे इ. मुळे पूर प्रवाहास अडथळे व नदीपात्राचे झालेले संकुचीकरण.
  • शहरी व ग्रामीण भागातील पूरपाणी निचरा व्यवस्थेची खालावलेली परिस्थिती.
  • नद्यांमधील पूरवहन क्षमतेत झालेली अभूतपूर्व घट.
  • नद्यांमधील गाळसाठ्यामुळे उंचावलेले व अरुंद झालेले नदीपात्र.
  • धरणांतर्गत पूर सामावून घेण्याची साठवण क्षमता नसल्यामुळे पूरनियमनात असलेल्या मर्यादा व इतर सुक्ष्मस्तरावरील कारणे.
  • बॅक वाटर अभ्यास  जलशास्त्रावर आधारित गणितीय मॉडेल वापरुन सद्यःस्थितीतील काही क्षेत्रीय मर्यादा लक्षात घेऊन केलेल्या अभ्यासाअंती कर्नाटकातील अलमट्टी व हिप्परगा जलाशय व त्यावरील पूरप्रचालनामुळे महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीवर थेट व विपरीत परिणाम होत नाही, असे संकेत दिसून येतात. (सद्य:स्थितीतील कर्नाटकातील व महाराष्ट्रातील क्षेत्रीय अप्राप्त माहिती नव्याने प्राप्त करून पुनर्भ्यास करावा, असे समितीने सुचविले आहे.) महत्त्वाच्या उपाय योजना / शिफारशी

  • पूरनिवारणार्थ नदीनाले संरक्षण व पुर्नस्थापन, पूरप्रवण क्षेत्रांचे संरक्षणासह पुर्नस्थापन, पूर मुकाबला सज्जता, पूरप्रवण क्षेत्रातील अवैध वापरावर चाप, एकूणच अतिक्रमणाविरुद्ध ठोस धोरणांचे अवलंबन करणे, अत्यावश्यक करणे तसेच पूरनिवारणार्थ व हवामान बदलाविषयकच्या महाराष्ट्र राज्य हवामान बदल रूपांतर धोरण परिणामकारकरीत्या राबविणे.
  • निषिद्ध / प्रतिबंधित क्षेत्रातील अतिक्रमणे प्राधान्याने हटविणेबाबत फ्लड प्लेन व झोनिंग नियम कोल्हापूर / सांगली जिल्ह्यासाठी लागू करणे.
  • परिणामकारक पूरनिवारणार्थ सशक्त / ठोस पूरपूर्वानुमान पद्धतीचा वापर, पूरसंवेदक पायाभूत सुविधा, परिचालन सुधारणा व आपत्ती व्यवस्थापन धोरणात्मक सुधारणा / कायदेशीर तरतुदींचे त्वरित अवलंबनाची गरज.
  • एककालिक पूर पूर्वानुमान पद्धत महाराष्ट्रासह कृष्णा खोऱ्यात अवलंब करणे.
  • पूरनिवारणास्तव अद्ययावत तंत्रज्ञान, संस्थागत व्यवस्था व धोरणे आखून अल्पकालीन पूर्वानुमान, एककालिक पूरपूर्वान पद्धती असुरक्षितता नकाशांसह, अद्ययावत आपत्ती नियोजन राबविणे.
  •  एकात्मिक जलाशय प्रचालन राबविणे.
  • नदीपात्र पुर्नस्थापित करणे. (वहन क्षमता)
  • निम्नपातळीवरील नदीतीर उंचावणे. (पूर प्रवण क्षेत्र नियंत्रण)
  • नदीपात्रातील काही अतितीव्र वळणे सरळ करणे. 
  • पूरनिवारणासाठी जागेची तपासणी करून साठवण तलाव निर्माण करणे.
  • पूरप्रवाहांचे आंतरखोरे विचलन प्रकल्प राबविणे.
  • आधुनिक पूर चेतावणी यंत्रणेचा वापर करणे / वाढविणे, असुरक्षित क्षेत्राचे नकाशे तयार ठेवणे.
  •  पूररेषा सुधारित करणे. (प्रतिबंधित व निषिद्ध क्षेत्राची पुनर्आखणी)
  • ठोस पर्जन्य पूर्वानुमान पद्धती राबविणे.
  • पूर निवारणासाठी सर्व संबंधित संस्थांमधील समन्वय वाढविणे व एकत्रितरीत्या परिणामकारक प्रचालन करणे.
  • जलशास्त्रीय प्रतिकृती अभ्यास, नदीपात्रातील बांधकामांचे लेखापरीक्षण, जलाशय प्रचालन अहवाल प्रस्तुतीकरण व लेखापरीक्षण करणे.
  • कृष्णा खोऱ्यांत अल्प मुदतीच्या हवामान पूर्वानुमानासाठी (२ ते ६ तास) x ब्रॅड रडार डॉपलर बसविणे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com