Agriculture news in marathi, heavy rain the area was filled with lakes in Javla | Agrowon

जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार होत आहे. त्यामुळे परिसरातील तलावांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे.

जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार होत आहे. त्यामुळे परिसरातील तलावांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. रविवारी (ता. १०) दुपारी झालेल्या दमदार पावसाने जेवळीसह परिसरातील साठवण तलाव भरून वाहत आहेत. 

पावसाळ्याच्या सुरवातीचे तीन महिने पावसाने दगा दिला. त्यामुळे या वर्षी चाऱ्या-पाण्याचा प्रश्न गंभीर होणार, या विचाराने शेतकरी, नागरिक हाताश झाले होते. मात्र अंतिम टप्प्यात पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली. यातही जेवळी परिसरात पावसाचा जोर कमी होता. सर्वत्र पूर परिस्थिती असताना ही या भागात नदी- नाल्यांना पूर आला नाही. गाव शिवारातील साठवण तलाव भरले नाहीत. परंतु गेल्या दोन- तीन दिवसांपासून परिसरात परतीचा पाऊस जोरदार होत आहे.

रविवारी (ता. १०) दुपारी तीन ते साडेचार या दीड तासाच्या काळात परिसरात मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला.यामुळे जेवळीसह हिप्परगा सय्यद, विलासपूर पांढरी, भोसगा, माळेगाव, करवंजी, वाडी वडगाव आदी ठिकाणचे तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे आता परिसरातील पाणी प्रश्न दूर होण्यासाठी मोठी मदत झाली आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात झालेल्या या पावसाने शेती क्षेत्राचे मात्र मोठे नुकसान केले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...