औरंगाबाद, जालन्यात जोरदार पाऊस

राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. गुरुवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, औरंगाबाद, जालनासह राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली.
औरंगाबाद, जालन्यात जोरदार पाऊस

पुणे: राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. गुरुवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, औरंगाबाद, जालनासह राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. तर पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या हजेरीने बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा धरणाचे पाच दरवाजे उघडून २ हजार ४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.    सोलापूर जिल्ह्यातील बुधवारी (ता. २९) मध्यरात्रीनंतर जोराच्या वादळासह पावसाला सुरुवात झाली. पंढरपूरसह पट, कुरोली, तुंगत, भाळवणी, भंडीशेगाव, व कासेगाव या सहा मंडळामध्ये मुसळधार पाऊस पडला. तर करकंब व पूळूज मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जोरदार पावसाने शेतशिवार अवघ्या तासाभरातच जलमय झाले. ओढे व नाल्यांतून पाणी वाहू लागले. शेताच्या ताली फुटल्यामुळे मातीची धूप झाली. मात्र, या पावसाचा उडीद, तूर, सोयाबीन, मूग, मटकी, हुलगा व मका पिकाला फायदा झाला आहे.  मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसाचा जोर कायम होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ६ मंडळांत अतिवृष्टी झाली. तर, जालना जिल्ह्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला. इतर जिल्ह्यातील काही मंडळे वगळता पावसाची हजेरी तुरळक राहिली. वाळूज, गारज, कन्नड, देवगाव, चिकलठाणा, वेरूळ या मंडळांत अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांतही अनेक मंडळांत मुसळधार पाऊस झाला.  गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्त्रोत: हवामान विभाग) :  कोकण : अलिबाग ४६, मुरूड ३९, पेण ४०, पोलादपूर ४१, सुधागडपाली ४०, उरण ३१, गुहागर ३८, लांजा ३६, राजापूर ११३, देवगड ४५, कणकवली ३५, वेंगुर्ला ३१.  मध्य महाराष्ट्र : श्रीरामपूर ५६, गिधाडे ४४, शिरपूर ६२, शिंदखेडा ४७, अंमळनेर ६३, चाळीसगाव ८०, दहीगाव ६४, जामनेर ७३, पारोळा ५२, शहादा ३१, चंदगड ५२, लोणावळा कृषी ५७, बार्शी ३०, पंढरपूर ७५.  मराठवाडा : कन्नड ४०, खुल्ताबाद ९८, फुलंब्री ३१, सोयगाव ४६, बदनापूर ५०, घनसांगवी ३५, पालम ३२, पाथरी ७२.  विदर्भ : मलकापूर २३, मेहकर २४, नांदुरा २१, सिंदखेड राजा २१, मंगरूळपीर २८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com