औरंगाबाद जिल्ह्यातील पाच मंडळामध्ये अतिवृष्टी

पाऊस
पाऊस

औरंगाबाद, परभणी  मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी २२४ मंडळामध्ये रविवारी (ता.२७) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. जालना, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळामध्ये पावसाचा जोर होता. शनिवारी (ता.२६) दुपारनंतर परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील पावासाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पावसामुळे भिजलेल्या सोयाबीन, कापसातील सरकीची मोड फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यातील आळंद, वडोदाबाजार, सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, भराडी, कन्नड तालुक्यातील नाचनवेल या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. आळंद मंडळात सर्वाधिक १०५ मिलीमीटर पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे नदी, नाले भरून वाहिले. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. जालना, बदनापूर, भोकरदन, अंबड, घनसावंगी तालुक्यातील मंडळामध्ये पावसाचा जोर होता. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी, जिंतूर, पूर्णा तालुक्यात पावसाचा जोर होता. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २९ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ३३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यातील काही मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २२ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी १८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (१० मिलिमीटरच्या पुढे) ः औरंगाबाद जिल्हा ः चौका २०, लाडसावंगी ३०, करमाड १०, फुलंब्री २८, आळंद १०५, वडोदाबाजार ९६, पिरबावडा १७,सिल्लोड ३१, अजिंठा ९१, अंबाई ५१, अमठाना ६२, भराडी ७०, गोळेगाव ४४, निल्लोड ३६, बोरगाव बाजार ५५, सोयगाव २९, सावलदबारा १३, वैजापूर १४, महालागाव ४२, लाडगाव २२, लोणी ४७, मांजरी २३, कन्नड ११, पिशोर ६१, करंजखेडा ४०, नाचनवेल ८६, चिंचोली लिंबाजी ५५, सुलतानपूर १४. जालना जिल्हा ः जालना २१, विरेगाव २०, बदनापूर ३५, रोषणगाव ६०, दाभाडी ३१, सेलगाव ३०, भोकरदन २७, धावडा ३२, पिंपळगाव रेणुकाई २५, हस्नाबाद २७, अनवा ३५, वरुड ११, माहोरा १०, धनगरपिंपरी २७, जामखेड १५, गोंदी २२, रोहिलगड १५, सुखापुरी ३०, राणीउंचेगाव १८, रांजणी १०, जांब समर्थ १२. परभणी जिल्हा ः सिंगणापूर १०, दैठणा १०, बोरी ११, सावंगी म्हाळसा १३, आडगाव २५, बामणी १४, पूर्णा २२, ताडकळस १२, चुडावा १७. हिंगोली जिल्हा ः माळहिवरा १९, सिरसम ११, डिग्रस ४२, कळमनुरी २३, आखाडा बाळापूर २९, डोंगरकडा १५, वारंगाफाटा २७, वसमत ३४, गिरगाव २३, कुरुंदा १०, टेंभुर्णी ५७, आंबा १८, हयातनगर ६२, सेनगाव २०, आजेगाव १०, साखरा ३५, औंढानागनाथ ३०, येळेगाव २९. नांदेड जिल्हा ः विष्णुपुरी २०, वजीराबाद १७, मुदखेड २१, मुगट ३४, बारड ३५, अर्धापूर १२, मनाठा ५०, पिंपरखेड १७, निवघा १६, तळणी ३५, माहूर ११, वानोळा १८, सिंदखेड १६, हिमायतनगर ३५, सिंधी २४, जाहूर १७. उस्मानाबाद जिल्हा ः   तेर १९, जळकोट ११, मुरुम १०, डाळिंब १६. बीड जिल्हा ः नाळवंडी १२, थेरला १५, अमळनेर २०, धामणगाव १४, दौलावडगाव १५, पिंपळा २५, टाकळसिंग १२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com